Join us

आता सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि अकोला  येथेही भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा सुरू  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 7:58 PM

जादा वजनाच्या असलेल्या या वस्तू, ग्राहकांना बुकिंगसाठी टपाल ऑफिस कार्यालयामध्ये नेणे अवघड आहे. त्यामुळे रेल्वेद्वारे टपालामधील सामग्रीची वाहतूक करण्यात येत आहे

मुंबई  - मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कल यांच्या संयुक्तरित्या सुरूवातीला मुंबई ते पुणे आणि नागपूर दरम्यान सुरू केली आहे. आता भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि अकोला येथेही उपलब्ध होणार आहे.  लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्यक्ती आणि व्यावसायिकांना मोठ्या आकाराचे मालवाहतूक करणे कठीण जात आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक पार्सल पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. जादा वजनाच्या असलेल्या या वस्तू, ग्राहकांना बुकिंगसाठी टपाल ऑफिस कार्यालयामध्ये नेणे अवघड आहे. त्यामुळे रेल्वेद्वारे टपालामधील सामग्रीची वाहतूक करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मध्य रेल्वेकडून चालविण्यात येणा-या विशेष पार्सल गाड्या लक्षात घेता मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र टपाल सर्कलने १५ मे पासून भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा ऑफर करून भारतीय टपाल सेवा व भारतीय रेल्वेच्या क्षमता एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.  भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांमध्ये तसेच दरम्यान उपलब्ध झाली. आता, कोल्हापूर, नाशिक आणि अकोला येथेही उपलब्ध होणार आहे.भारतीय टपाल सेवा ग्राहकांच्या आवारातून वस्तू घेईल. मध्य रेल्वे व टपाल मेल मोटर सेवा द्वारे चालविल्या जाणार्‍या खास पार्सल गाड्यांच्या माध्यमातून गंतव्य स्थानकावर वस्तू पोहचवेल जात आहे. यामध्ये ग्राहकांना दोन क्विंटल किंवा त्याहून अधिक असलेल्या पार्सल वस्तू घरापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. ग्राहकांच्या दारातून या वस्तू मध्य रेल्वे आणि टपाल घेऊन जाणार आहे.

 

टॅग्स :भारतीय रेल्वेपोस्ट ऑफिस