भारतीय डाक कर्मचारी महासंघाची आंदोलनाची हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 06:15 AM2019-09-16T06:15:30+5:302019-09-16T06:15:39+5:30
भारतीय डाक कर्मचारी महासंघाने ४४ विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे.
मुंबई : भारतीय डाक कर्मचारी महासंघाने ४४ विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन अभिनव पद्धतीने करण्यात येणार आहे. नवीन पेन्शन रद्द करून सर्वांसाठी जुना पेन्शन कायदा लागू करावा, सर्व मृत कर्मचाऱ्यांच्या जागेवर त्यांच्या वारसांना नोकरी द्यावी, अशा प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय डाक कर्मचारी संघाचे नेते बापू दडस यांनी दिली.
१९ सप्टेंबर रोजी सायं. ६ ते स. ६ वाजेपर्यंत डिव्हिजन कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, २१ रोजी सर्कल स्तरावर, तर २५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे डाक भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे सांगण्यात आले.