भारतीय रेल्वेचा १६२वा वाढदिवस

By Admin | Published: April 16, 2015 01:51 AM2015-04-16T01:51:47+5:302015-04-16T01:51:47+5:30

एका दिवसात सुमारे अडीच कोटी प्रवासी वाहून नेणाऱ्या आणि एक लाख पंधरा हजार किलोमीटर रुळांचे जाळे असलेल्या भारतीय रेल्वेचा आज १६२ वा वाढदिवस आहे.

Indian Railway's 162nd Birthday | भारतीय रेल्वेचा १६२वा वाढदिवस

भारतीय रेल्वेचा १६२वा वाढदिवस

googlenewsNext

मुंबई : एका दिवसात सुमारे अडीच कोटी प्रवासी वाहून नेणाऱ्या आणि एक लाख पंधरा हजार किलोमीटर रुळांचे जाळे असलेल्या भारतीय रेल्वेचा आज १६२ वा वाढदिवस आहे. भारतातील पहिली रेल्वे ठाणे ते बोरिबंदर या मार्गावर १६ एप्रिल १८५३ रोजी धावली होती. या ट्रेनसाठी तब्बल दहा हजार कामगारांनी हातभार लावला आणि पहिली ट्रेन यशस्वी झाली. पहिल्या फेरीत तब्बल ४00 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद रेल्वेकडे आहे. या निमित्त सध्या देशभर रेल्वे सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
इंग्रजांना १८१९ मध्ये दक्षिण (दख्खन) जिंकल्यानंतर व्यवसाय आणि अन्य काही गोष्टींसाठी साम्राज्य दक्षिण आणि कोकणशी जोडणे महत्त्वाचे होते. रेल्वेच्या आगमनापूर्वी भोरघाट (१८३०) आणि माहिम-बान्द्रा कॉजवे हे देशाच्या दक्षिण आणि पश्चिम नगरांना सर्वांत मोठी भूमिका बजावत होते. मात्र तरीदेखील रेल्वेची इंग्रजांना अत्यंत गरज होती. १७ आॅगस्ट १८४९ रोजी ईस्ट इंडिया कंपनी आणि जीआयपीने (ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे) प्रायोगिक तत्त्वावर एक रेल्वे लाईन टाकण्याच्या करारावर सह्या केल्या. त्यानंतर १४ नोव्हेंबर १८४९ रोजी जेम्स. जे. बर्कले या अधिकाऱ्याला इंग्लंडमध्ये भारतात कंपनीचे चीफ रेजिडेंट इंजिनियर म्हणून निवडण्यात आले. बर्कले यांनी ७ फेब्रुवारी १८५0 रोजी मुंबईत आल्यानंतर लगेचच मुंबई ते ठाणे, माहिम व कल्याणपर्यंतचा सर्वे पूर्ण केला.

कर्मचारी, कामगारांचा गौरव
पहिली ट्रेन १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. ही पहिली सेवा सुरु होऊन १६२ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आमच्याकडून रेल्वे सप्ताह साजरा होत आहे. कर्मचारी आणि कामगारांंचा गौरव यानिमित्त आम्ही करतो. - नरेन्द्र पाटील, मध्य रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी

Web Title: Indian Railway's 162nd Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.