उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची ब्रिटनलाही पसंती; गेल्या वर्षीपेक्षा ६३ टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 04:54 AM2019-12-10T04:54:49+5:302019-12-10T05:58:36+5:30
३० हजारांहून अधिक भारतीयांना ब्रिटिश व्हिसा
मुंबई : अमेरिका किंवा ब्रिटन म्हणजे उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचे ड्रीमलँड होऊ लागले आहे. दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी आणि त्यानंतर जगभर डंका मिरवणाऱ्या डॉलरमध्ये कमाई करण्यासाठी भारतीय विद्यार्थी, नोकरदार अमेरिकेची वाट धरतात. नुकत्याच ब्रिटिश इमिग्रेशन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा ३० हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ब्रिटिश व्हिसा मिळाला आहे. मागील वर्षी ही संख्या १९ हजार विद्यार्थी इतकी होती. ही वाढ तब्ब्ल ६३ टक्के इतकी आहे.
ओपन डोअर्सच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसारही अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. भारतीय विद्यार्थ्यांकडून अमेरिकेनंतर दुसºया क्रमांकांची पसंती ही ब्रिटे (युके) ला दिली जाते. अमेरिकेप्रमाणे शिक्षणाची व्यवस्था आणि दर्जा युकेमध्ये अतिशय उत्तम असून तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, सर्व सोयीसुविधा, मोठ्या प्रमाणावर सातत्याने सुरू असलेले संशोधन, शिक्षण व्यवस्थेतील लवचिकता भरपूर पर्याय, उद्योग जगताशी सुसंगत अभ्यासक्रम यासाठी अमेरिका प्रसिद्ध आहे.
शिक्षण व अन्य गोष्टींसाठी मिळणाºया या सर्व चांगल्या, दर्जेदार सुविधांमुळेच देश-विदेशातील लाखो विद्यार्थी दरवर्षी उच्च शिक्षणासाठी युकेची वाट धरत असल्याचे अहवालानुसार समोर आले आहे. जगातील ३ सर्वोत्तम शैक्षणिक संस्था युकेमध्ये स्थित असून
मागील दशकात २ लाख ७० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी युकेमधील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांचा लाभ घेतला आहे असे अभ्यास अहवालावरून स्पष्ट झाले आहे. युके केवळ शैक्षणिक संस्थांसाठीच प्रसिद्ध नाही तर शैक्षणिक संस्थांसह पर्यटनासाठीही प्रसिद्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. तब्बल ५ लाख १२ हजार भारतीय नागरिकांनी युकेभेटीसाठी आवश्यक व्हिसाचा वापर केल्याची आकडेवारी इमिग्रेशन विभागाकडून देण्यात आली आहे.
दोन देशांमधील संबंध सुदृढ होतील
इतर देशांच्या शैक्षणिक धोरणांच्या तुलनेत ब्रिटनमधील शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी जास्त लवचिक आहे. शिवाय येथे शिक्षण घेण्यासाठी येणाºया भारतीय विद्यार्थ्यांमुळे भारत आणि ब्रिटन यांच्यामधील संबंध शैक्षणिक क्षेत्रासह सर्वच आर्थिक व सामाजिक पातळीवर अधिक सुदृढ होण्यास मदत होईल, अशी आशा आहे.
- क्रिस्पिन सिमॉन, ब्रिटिश उपायुक्त (पश्चिम भारत)