भारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:07 AM2021-05-18T04:07:05+5:302021-05-18T04:07:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सरकारवर काही आंतरराष्ट्रीय बंधने असतात, तसेच कर्तव्य व जबाबदाऱ्या असतात. त्यानुसारच इस्रायल-पॅलेस्टाइन संबंधात सध्या ...

Indians should become nationalists like the people of Israel - Pushpendra Kulshreshtha | भारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

भारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सरकारवर काही आंतरराष्ट्रीय बंधने असतात, तसेच कर्तव्य व जबाबदाऱ्या असतात. त्यानुसारच इस्रायल-पॅलेस्टाइन संबंधात सध्या काय निवेदन करायचे ते ठरते. सरकारने आपल्या निवेदनात म्हटले की, तेथे होणारे हल्ले थांबवून दोन्ही बाजूने संयम पाळावा; पण इस्रायलच्या बाजूने भारत सरकारने बोलावे, इस्रायलच्या पंतप्रधानांसारखा आपला पंतप्रधान असावा असे आपण बोलत असतो; पण त्याआधी आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की इस्रायली जनता लहान-थोरांपासून सकाळपासून रात्रीपर्यंत जगताना इस्रायलसाठी जगते. त्यांच्या राष्ट्रवादात भेसळ नसते. आपल्या समाजाला इस्रायली लोकांप्रमाणे बनावे लागेल. आपल्या पंतप्रधानांनी नेतान्याहू व्हावे असे वाटत असेल तर भारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे, असे परखड मत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी व्यक्त केले.

सावरकर स्मारकाने रविवारी आयोजित केलेल्या ‘वीर सावरकर कालापानी मुक्ती शताब्दी’ ऑनलाइन व्याख्यानमालेत कुलश्रेष्ठ पुढे म्हणाले की, सरकारला आपण निवडून देतो; पण समाजातील काही व्यक्ती द्वेष माजवितात व दुफळी तयार करतात. म्यानमार-बांगलादेशींना येथे राहण्यास स्थिरस्थावर होण्यास मदत करतात. लोकसंख्या वाढवून देशाची साधनसंपत्ती वापरून ते भारताला पोकळ करण्याचे काम करीत आहेत. आपण इमानदार आहोत का? हे प्रत्येक भारतीयाने तपासले पाहिजे. सरकारवर सारे काही अवलंबून राहण्याची मानसिकता घातक आहे. सरकारवर घाबरट आणि कमकुवत लोक अवंलबून असतात.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भौगोलिक आधारावरील हिंदुत्वाला मानत होते, त्यांना जातिव्यवस्था मान्य नव्हती, मनुष्य आपल्या कर्माने आपले श्रेष्ठत्व वा जात नक्की करतो, असे त्यांचे म्हणणे होते. काही गद्दार लोक दिल्लीत सरकार आले म्हणून घाबरलेले नाहीत, तर हिंदू त्यांचे मूळ अस्तित्व जाणू लागले आहेत. यालाच घाबरून हे लोक आता अस्तित्वासाठी अशी आंदोलनादी कृत्ये करू लागले आहेत. आता हिंदू होण्याबाबत लोक लाजत नाहीत, ते आपले म्हणणे स्पष्ट मांडू लागले आहेत. राष्ट्र चालविण्यासाठी जी एकजूट हवी ती हिंदूंनी केली पाहिजे. त्यादृष्टीने आता समाज बदलू लागला आहे; पण त्यासाठी अजून काही वर्षे जावी लागतील, असेही त्यांनी सांगितले.

.....................................................

Web Title: Indians should become nationalists like the people of Israel - Pushpendra Kulshreshtha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.