देशाचा डिजिटल रुपया लाॅंच; नऊ बँकांमध्ये झाली सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 06:35 AM2022-11-02T06:35:24+5:302022-11-02T06:36:02+5:30
डिजिटल चलने ‘सीबीडीसी होलसेल’ आणि ‘सीबीडीसी रिटेल’ अशी २ प्रकारची आहेत.
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मंगळवारी देशाचे पहिले डिजिटल चलन सुरू केले. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) असे या चलनाचे अधिकृत नाव असून पथदर्शक प्रकल्पांतर्गत ते जारी करण्यात आले आहे.
डिजिटल चलने ‘सीबीडीसी होलसेल’ आणि ‘सीबीडीसी रिटेल’ अशी २ प्रकारची आहेत. मंगळवारी सुरू झालेले सीबीडीसी हे होलसेल श्रेणीतील आहे. याचा वापर बँका, बिगर बँक वित्तीय कंपन्या आणि अन्य मोठ्या संस्था करतील. त्यानंतर ‘सीबीडीसी रिटेल’ जारी होईल. त्याचा वापर सामान्य लोक करू शकतील.