भारताचे ड्रोन प्रदर्शन चीन - पाकिस्तानला क्षमता दाखवण्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:08 AM2021-01-19T04:08:20+5:302021-01-19T04:08:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारताने लष्कर दिनानिमित्ताने केलेल्या ड्रोनच्या प्रात्याक्षिकाचे प्रदर्शन हे केवळ चीन आणि पाकिस्तानला आपली क्षमता ...

India's drone demonstration to show capability to China-Pakistan | भारताचे ड्रोन प्रदर्शन चीन - पाकिस्तानला क्षमता दाखवण्यासाठीच

भारताचे ड्रोन प्रदर्शन चीन - पाकिस्तानला क्षमता दाखवण्यासाठीच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारताने लष्कर दिनानिमित्ताने केलेल्या ड्रोनच्या प्रात्याक्षिकाचे प्रदर्शन हे केवळ चीन आणि पाकिस्तानला आपली क्षमता दाखविण्यासाठीच होते, असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकच्या स्ट्रेटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानात केले.

भारतीय लष्कराने प्रथमच आपल्याकडे असलेल्या ड्रोनची क्षमता जगासमोर आणली. लष्कर दिनानिमित्ताने झालेल्या संचलनामध्ये भारताने ड्रोनचे शक्तिप्रदर्शन केले. हे ड्रोन कुठल्याही मानवी नियंत्रणाविना शत्रूच्या ठिकाणांना कशाप्रकारे लक्ष्य करू शकते, हे यावेळी लष्कराने दाखवून दिले. अनेक ड्रोन एकत्र मिळून एका मोहिमेला तडीस नेतात. या सिस्टिमला ड्रोन स्वॉर्मिंग म्हणतात. हे नवे तंत्र भविष्यात युद्धाचे संपूर्ण चित्र बदलू शकते. नो कॉन्टॅक्ट वॉरफेअर म्हणजेच कुठल्याही संपर्काविना होणाऱ्या युद्धात हे हत्यार अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वासही हेमंत महाजन यांनी व्यक्त केला.

Web Title: India's drone demonstration to show capability to China-Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.