Join us

मुंबईत पाळीव प्राण्यांसाठी भारतातील पहिली मोबाईल पेट अंत्यसंस्कार व्हॅन

By मनोहर कुंभेजकर | Published: July 08, 2023 6:29 PM

मुंबै बँकेचे संचालक व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी या अभिनव प्रकल्पाची लोकमतला माहिती दिली.

मनोहर कुंभेजकर

मुंबई-पाळीव प्राण्यांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कसे करायचे याची चिंता पाळीव प्राणी प्रेमिकांना असते. मात्र, त्यांच्यावर सोयीस्कर आणि आदरयुक्त अंत्यसंस्कार करणे आता शक्य झाले आहे.सदर व्हॅनचे उदघाटन झाल्यावर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १,आयसी कॉलनीतील भारतातील पहिली पहिली मोबाईल पेट अंत्यसंस्कार व्हॅन दहिसर-बोरीवली येथील पाळीव प्राण्यांसाठी उपलब्ध होणार आहे.विशेष म्हणजे ही व्हॅन पर्यावरण पूरक असून विद्युत दहिनीत  मृत पाळीव प्राण्यांवर  अंत्यसंस्कार होणार आहे. मुंबै बँकेचे संचालक व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी या अभिनव प्रकल्पाची लोकमतला माहिती दिली.

या मोबाईल पेट स्मशान व्हॅनचे उद्घाटन उद्या रविवार ९ जुलै  रोजी सकाळी ११ वाजता बोरिवली पश्चिम,आयसी कॉलनी, झोइक पेट पार्क, वायएमसीए ग्राउंड, आयसी कॉलनी येथे एमएचबी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या हस्ते होणार आहे. हॅप्पी बड्स फाऊंडेशन या अशासकीय संस्थेने सदर अभिनव प्रकल्पाची उभारणी केली असून या उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले असून मृत दयाळू प्राण्यांना  निरोप देण्यासाठी खास डिझाइन करून या पेट व्हॅनची निर्मिती केली असल्याची माहिती माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी लोकमतला दिली. 

पाळीव प्राण्याचे निधन झाल्यावर पाळीव प्रेमिकांना दुःख होते.त्यामुळे आमचे त्यांच्यावर सोयीस्कर आदरयुक्त अंत्यसंस्कार करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.पाळीव प्राणी आणि त्यांच्या मालकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या आमच्या प्रयत्न आहे.त्यामुळे प्राणी प्रेमळ मित्रांसाठी अधिक दयाळू आणि काळजी घेणारा समाज तयार करू शकतो असे मत घोसाळकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :मुंबईदहिसर