Join us

देशातील सर्वांत मोठ्या सागरी सेतूचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 5:29 AM

मुंबईहून नवी मुंबई २० मिनिटांत; ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचेही करण्यात आले लाेकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई / नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात अटल सेतूच्या लोकार्पणासह सूर्या प्रकल्प आणि उरण-नेरूळ रेल्वेमार्गासह सुमारे ३० हजार ५०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमारास अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा सेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून, प्रवाससुद्धा करणार आहेत.

काळाराम मंदिरात दर्शन

सकाळी नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन तसेच गोदाआरतीदेखील करणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला रवाना होतील.

  • १७ आयफेल टॉवर वजनाइतक्या म्हणजेच सुमारे १ लाख ७० हजार मेट्रिक टन स्टीलच्या सळ्यांचा वापर 
  • ६५ ते १८० मी. लांबीच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर
  • २१,२०० काेटी एकूण खर्च
  • २२ किमी एकूण लांबी
  • १६.५  किमी समुद्रात
  • ५.५ किमी जमिनीवर

 

  • स्टॅचू ऑफ लिबर्टीपेक्षा सहा पट म्हणजेच सुमारे 
  • ९ लाख ७५ हजार घ.मीटर काँक्रीटचा वापर
  • ८५ हजार मेट्रीक टन ऑर्थोट्रॉपिक स्टीलचा  वापर
  • पृथ्वीच्या व्यासाच्या ४ पट सुमारे ४८ हजार किमी लांबीच्या प्रिस्टेसिंग वायर्सचा वापर
टॅग्स :नवी मुंबईमुंबईनाशिकनरेंद्र मोदीपंतप्रधान