नवी मुंबई : भारताला विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे नेण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. नेरुळमधील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या नवव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.या सोहळ््यात सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना पदवीदान करून गौरवण्यात आले. यावेळी नेरुळ आणि सीबीडीमधील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या मेडिकल, दंतवैद्यकीय, आयुर्वेदशास्त्र, बायोटेक्नोलॉजी, सोशल सायन्स, विज्ञान, मॅनेजमेंट आदी शाखेत पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांनी नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे कौतुक केले. तरुणांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि देश घडवावा, असे आवाहन त्यांनी केले. बकुळ रजनी पटेल आणि राम जिवतराम बक्सानी यांना डॉक्टर आॅफ लिटरेचर तर, मार्टीन के. चर्च यांना डॉक्टर आॅफ सायन्स या पदवीने गौरवण्यात आले. प्रत्येक शाखेत सुर्वणपदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कुलपती डॉ. बी. पी. साबळे, संस्थापक डी.वाय. पाटील, अध्यक्ष विजय डी. पाटील, कुलगुरू संजय ओक, कुलसचिव प्रो. के. वेंकटरमणी तसेच शिक्षक आणि पालक उपस्थित होते.
शिक्षणाच्या बळावरच देशाची प्रगती
By admin | Published: March 26, 2015 11:57 PM