Join us

ओमायक्रॉन: राज्यात रात्रीच्या संचारबंदीचे संकेत; मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 5:48 AM

राज्यात वाढत असलेला ओमायक्रॉन संसर्गाचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : राज्यात वाढत असलेला ओमायक्रॉन संसर्गाचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. ओमायक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, यावर या बैठकीत चर्चा झाली. राज्यात पुन्हा रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागू करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच, ३१ डिसेंबरला रात्री केले जाणारे नववर्षाचे सेलिब्रेशन यावर निर्बंध आणण्यासंदर्भातही या बैठकीत विचार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत बोलताना रात्रीच्या संचारबंदीचे संकेत दिले होते. 

टॅग्स :ओमायक्रॉनकोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरे