सागरी मार्गासाठी देशी सल्लागार
By admin | Published: January 10, 2016 01:28 AM2016-01-10T01:28:55+5:302016-01-10T01:28:55+5:30
सर्व छोट्यामोठ्या प्रकल्पांसाठी परदेशी सल्लागारांमागे धावणाऱ्या पालिकेने कोस्टल रोडकरिता देशी सल्लागार नेमला आहे़ मात्र पुरेसा अनुभव नसल्याचे कारण पुढे करत या सल्लागाराला
मुंबई : सर्व छोट्यामोठ्या प्रकल्पांसाठी परदेशी सल्लागारांमागे धावणाऱ्या पालिकेने कोस्टल रोडकरिता देशी सल्लागार नेमला
आहे़ मात्र पुरेसा अनुभव नसल्याचे कारण पुढे करत या सल्लागाराला
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी नेमण्यास स्थायी समितीने आक्षेप घेतला होता़ परंतु पालिकेच्या महासभेने या नियुक्तीला अंतिम मंजुरी दिली आहे़
नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंतच्या ३३ कि़मी़च्या सागरी मार्गासाठी सहा ते सात टप्प्यांमध्ये काम होणार आहे़ पर्यावरणवादी, मच्छीमार यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला होता़ मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नुकताच या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे़ त्यानुसार या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत़ जागतिक स्तरावर निविदा न
मागविता पालिकेने या प्रकल्पासाठी मे़ फ्रिशमन प्रभू इंडिया लि़ यांची नियुक्ती केली आहे़ या कामाचा अनुभव नसलेल्या कंपनीला सल्लागार म्हणून नेमल्यास या प्रकल्पामध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची भीती
स्थायी समिती सदस्यांनी व्यक्त केली होती़ मात्र पालिकेच्या महासभेने सल्लागार म्हणून याच कंपनीची नियुक्ती कायम ठेवली़
वाहतूककोंडीमुळे पश्चिम उपनगरातून शहराकडे जाण्यास
एक ते दीड तास लागतो़ सागरी मार्गाच्या माध्यमातून प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी हा प्रकल्प सुचविण्यात आला आहे़ त्यानुसार नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंत ३३ कि़मी़चा सागरी मार्ग उभारण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
१६० हेक्टरमध्ये भराव
सागरी मार्गासाठी समुद्रात १६० हेक्टर्समध्ये भराव टाकण्यात येणार आहे़ यापूर्वी केवळ बंदर बांधण्यासाठी अशा प्रकारचे भराव टाकण्याची परवानगी देण्यात येत होती़ मात्र रस्त्यासाठी समुद्रात भरणी टाकण्याची परवानगी मिळालेली मुंबई पालिका ही देशातील पहिली पालिका ठरणार आहे़