स्वदेशी मोनोरेल : सुट्ट्या भागांच्या खरेदीचा खर्च ७४ टक्के कमी झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 06:28 PM2020-12-17T18:28:18+5:302020-12-17T18:28:34+5:30

Monorail news : स्थानिक नामांकित संस्थेच्या मदतीने उपलब्ध असलेल्या विविध तंत्रज्ञानाचा वापर

Indigenous Monorail: The cost of buying spare parts has come down by 74 per cent | स्वदेशी मोनोरेल : सुट्ट्या भागांच्या खरेदीचा खर्च ७४ टक्के कमी झाला

स्वदेशी मोनोरेल : सुट्ट्या भागांच्या खरेदीचा खर्च ७४ टक्के कमी झाला

googlenewsNext

मुंबई :  सद्यस्थित स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या स्वदेशी सुट्ट्या भागांचा वापर करून मोनोरेलची पुनर्बांधणी केली जात असून, सुट्ट्या भागांच्या खरेदीचा खर्च परदेशी विक्रेत्यांच्या किंमतीच्या तुलनेत ७४ टक्के एवढा कमी झाला. स्थानिक नामांकित संस्थेच्या मदतीने उपलब्ध असलेल्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करून या यंत्रणेच्या विश्वासार्हतेचे परीक्षण केले जाते आहे. केबल्स व कनेक्टर, ट्रॅक्शन मोटर सारख्या उपकरणांदमध्ये बदल केले जात असून, गाड्यांचा वक्तशीरपणा जवळपास १०० टक्के एवढा होत आहे, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. शिवाय पुढील आठवड्यात आणखी एक स्वदेशी मोनोरेल सुरू केली जाईल. आणि गाड्यांमधील अंतर १८ मिनिटे करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.

डिसेंबर २०१८ पासून प्राधिकरणाने मोनोरेल वाहतुकीकरिता गाड्यांच्या उपलब्धते करिता प्रयत्न सुरु केले. मुंबई मोनोरेल हा मुंबईतला नाही तर भारतातला एकमेव प्रकल्प असल्याकारणाने सुटे भाग मिळण्यास अडचण आली. माजी कंत्राटदाराचे मूळ उपकरणाचे उत्पादन करणाऱ्यासोबत मतभेद असल्याने त्यांची मदत मिळाली नाही. फेब्रुवारी २०१९ मध्ये एका मोनोरेलची पुनर्बांधणी केली गेली. आणि त्यानंतर दुस-या कामावरही भर दिला गेला. दरम्यान, कोरोनामुळे राज्य सरकार आणि भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑपरेशन तात्पुरते थांबवले गेले होते. परंतु देखभाल दुरुस्तीची कामे या काळात सुरू ठेवण्यात आली. या काळात व्यवस्थापन व मनुष्यबळ उपलब्धता हे मोठे आव्हान होते. शासकीय सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. कोविडमुळे सुटे भागांच्या वितरणावर बराच परिणाम झाला. ज्याचा परिणाम मोनोरेल गाड्यांच्या पुनर्बांधणीस झाला. मात्र आम्ही यावर मात केली, असे एमएमआरडीएने सांगितले.
 

Web Title: Indigenous Monorail: The cost of buying spare parts has come down by 74 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.