मुंबई : सोमवारी दुपारी इंडिगो कंपनीच्या मुंबईहून अलाहाबादसाठी रवाना झालेल्या विमानाने अर्ध्या वाटेत असताना हवेत हेलकावे खाल्ल्याने विमानातील तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. अलाहाबाद येथे उतरल्यावर या जखमी कर्मचाऱ्यांवर औषधोपचार करून, त्याच विमानातून प्रवासी म्हणून मुंबईला परत आणण्यात आले. यामुळे विमानाच्या परतीच्या प्रवासास सुमारे सहा तासांचा विलंब झाला.इंडिगोच्या प्रवक्त्याने यास दुजोरा देताना सांगितले की, हे विमान सोमवारी दु. १.३० वाजता मुंबईहून रवाना झाले. ७१६ मैलांचा प्रवास करून ते दु. १.३० वाजता अलाहाबादला पोहोचणे अपेक्षित होते. उड्डाणानंतर साधारण तासाभराने प्रवाशांना अल्पोपाहार दिला जात असताना वाºयाच्या तीव्र झोतांमुळे विमान हेलकावे खाऊ लागले. यामुळे प्रवाशांना सेवा देणारे तीन विमान कर्मचारी तोल जाऊन पडले व किरकोळ जखमी झाले.जखमी कर्मचाऱ्यांना येताना प्रवासी म्हणून परत आणण्याचे ठरल्याने, पर्यायी कर्मचाºयांची व्यवस्था करावी लागली. त्यामुळे तासाभरात लगेच परत फिरणारे हे विमान रात्री आठ वाजता अलाहाबादहून मुंबईला रवाना झाले. या विलंबाने व खास करून वेळीच योग्य माहिती न दिली गेल्याने प्रवाशांना खूप त्रास झाला. इंडिगोची मुंबई-अलाहाबाद विमानसेवा गेल्या एप्रिलपासून सुरू करण्यात आली असून, दोन शहरांना जोडणारी ती एकमेव विमानसेवा आहे.
इंडिगो विमानास हेलकावे; तीन कर्मचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 4:38 AM