भारत-यूके विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:06 AM2021-04-22T04:06:28+5:302021-04-22T04:06:28+5:30
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने युनायटेड किंगडममध्ये (यूके) कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे २४ ...
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने युनायटेड किंगडममध्ये (यूके) कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे २४ ते ३० एप्रिलदरम्यान भारत-यूके विमानसेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती एअर इंडियाने दिली.
या काळात प्रवाशांनी आरक्षित केलेल्या तिकिटांचा परतावा देण्याबाबत किंवा सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. ३० एप्रिलनंतर यूके प्रशासनाने निर्बंध हटविल्यास मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून सेवा सुरू करण्यात येईल. त्याबाबतची माहिती सोशल मीडिया आणि प्रसिद्धिमाध्यमांद्वारे देण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन एअर इंडियाकडून करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आल्याने सध्या एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीद्वारे भारतीय प्रवाशांना विशेष सेवा देण्यात येत आहे.