इंद्राणी मुखर्जी पुन्हा जे. जे. रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 09:39 PM2018-09-24T21:39:09+5:302018-09-24T21:50:50+5:30

इंद्राणी मुखर्जी हिला अचानक डोके दुखीचा त्रास झाला. सायंकाळपासून एकच वस्तू दोन दिसत असल्याचे तिने डाॅक्टरांना सांगितले.

Indrani Mukherjee J. J. Admitted to the hospital | इंद्राणी मुखर्जी पुन्हा जे. जे. रुग्णालयात दाखल 

इंद्राणी मुखर्जी पुन्हा जे. जे. रुग्णालयात दाखल 

मुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला प्रकृती अस्वास्थामुळे सायंकाळी उशिरा जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आज रूग्णालायचे  वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संजय सुरासे यांनी दिली. इंद्राणीच्या वैद्यकीय तपासण्या सुरु असल्याचेही डाॅ. सुरासे म्हणाले.

 
इंद्राणी मुखर्जी हिला अचानक डोके दुखीचा त्रास व्हायला लागला. सायंकाळपासून एकच वस्तू दोन दिसत असल्याचे तिने डाॅक्टरांना सांगितले. दरम्यान तिची प्रकृती अस्वस्थ आढळून आली. मुखर्जीला ययापूर्वी हापरटेंशन आणि स्पाॅन्डीलीसचा त्रास सुरु होता. तरीही तिच्या आरोग्य तपासण्या  जे. जे. रुग्णालयाच्या वरिष्ठ डाॅक्टरांकडून सुरु असल्याचे  जे. जे. रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. तपासण्यानंतर त्यांना त्वरीत सोडण्यात येईल कि दाखल करून घेण्यात येईल याबाबत ठरविण्यात येईल. शुक्रवारी मध्यरात्री इंद्राणीला  जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अद्याप संबंधित आरोग्य तपासण्या सुरु आहेत आणि त्या पूर्ण झालेल्या नाहीत.

Web Title: Indrani Mukherjee J. J. Admitted to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.