Join us

कैद्यांच्या गणवेशातून इंद्राणीची सुटका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:07 AM

शीना बोरा हत्या प्रकरण : विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळलालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंडरट्रायल्स असतानाही कारागृह प्रशासन आपल्याला ...

शीना बोरा हत्या प्रकरण : विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंडरट्रायल्स असतानाही कारागृह प्रशासन आपल्याला कैद्यांचा गणवेश घालण्याची सक्ती करत असल्याची तक्रार करत शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने विशेष न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने मंगळवारी तिचा अर्ज फेटाळल्याने तिला कैद्यांचा गणवेश घालावा लागेल.

शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली. आधी स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर सीबीआयकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. इंद्राणी सध्या भायखळा कारागृहात आहे. कारागृह प्रशासनाने तिला कैद्यांचा गणवेश घालण्यास सांगितले. अंडरट्रायल असल्याने कारागृह प्रशासन मला कैद्यांचा गणवेश घालण्यास जबरदस्ती करू शकत नाही. त्यामुळे मला गणवेश घालण्यापासून सवलत मिळावी, असा अर्ज गेल्या महिन्यात इंद्राणीने विशेष न्यायालयात केला होता.

मंगळवारी विशेष न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला. एप्रिल २०१२ मध्ये इंद्राणी हिने तिची मुलगी शीना हिची गळा दाबून हत्या केली. तिचा मृतदेह रायगडमधील एका जंगलात जाळला. हा गुन्हा २०१५ मध्ये उघडकीस आला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.

....................