Join us

निर्यातीला चालना देण्यासाठी आता औद्योगिक उद्यान प्रकल्प; 200 कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 7:11 AM

१०० एकर सलग जमिनीवर उद्योग उभारणार, २०० कोटींची किमान गुंतवणूक

मनोज मोघे  मुंबई : राज्यात सेझ (एसईझेड) आणि असाइड (एएसआयडीई) यासारख्या प्रकल्पांना पुरेसे यश न मिळाल्याने निर्यातक्षम उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून निर्यातभिमुख औद्योगिक उद्यान प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. समृद्धी महामार्ग, अन्य महामार्ग, एक्स्प्रेस-वे, बंदरे, विमानतळ, रेल्वेजंक्शन परिसरात हे औद्योगिक पार्क उभारले जाणार आहेत. यासाठी किमान २०० कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. 

राज्य सरकारकडून नुकतीच निर्यातीला चालना देण्यासाठीचे धोरण मंजूर करण्यात आले. या धोरणांतर्गत सेझ आणि असाइडच्या धर्तीवर निर्यातभिमुख पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम (ईओआयडीपी) हे धोरण तयार करण्यात आले आहे. 

परकीय गुंतवणूक१३०.५७ अब्ज   ऑक्टोबर, २०१९ ते मार्च, २०२३ कालावधीत देशातील एकूण गुंतवणुकीत राज्याचा वाटा २९% .

या क्षेत्रांत निर्यातजेम्स,ज्वेलरी २८%, इंजिनिअरिंग २३%, कृषी,संलग्न क्षेत्रे १४%, रसायने १०%, लोह,पोलाद ७%, फार्मास्युटिकल्स ५%, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल कॉम्पोनेंट ५%, टेक्स्टाइल व ॲपरेल ४%, प्लास्टिक उत्पादने २ %, खाणी-खनिजे २%.

असे उभे राहणार औद्योगिक पार्कnमहामार्ग, इंडस्ट्रिअल कॉरिडॉर परिसरात १०० एकर सलग जमिनीवर निर्यात प्राेत्साहन क्षेत्र,  किमान गुंतवणूक २०० कोटी.nबंदर परिसरात किमान ५० एकर सलग जमिनीवर प्रकल्प, किमान गुंतवणूक १०० कोटी.n२० टक्के क्षेत्र सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगासाठी राखीव.nसमृद्धी महामार्गालगत एमएसआरडीसीकडून एमआयडीसीला विनामूल्य भूखंड हस्तांतरित करणार.nसरकारकडून उद्योगांना १०० कोटींपर्यंतचे अर्थसाहाय्य. nप्रकल्पांची उभारणी सरकारच्या नियंत्रणातील यंत्रणा किंवा खासगी संस्था, सरकारी-खासगी भागीदारीतून करता येणार.

निर्यातीत शहरांचा वाटा

मुंबई उपनगर    २१% मुंबई    २०% पुणे    १७% ठाणे    ८%रायगड    ७% पालघर    ५% छत्रपती संभाजीनगर    ४% नाशिक    ४% नागपूर    २% सातारा    २% 

टॅग्स :एमआयडीसीमुंबईव्यवसाय