औद्योगिक सुरक्षा धोक्यात
By admin | Published: March 27, 2015 12:05 AM2015-03-27T00:05:14+5:302015-03-27T00:05:14+5:30
रिलायन्स सिलिकॉन कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले असताना आगीचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे.
अमोल पाटील ल्ल खालापूर
रिलायन्स सिलिकॉन कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले असताना आगीचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. तालुक्यात वारंवार कारखान्यांना लागणाऱ्या आगीमुळे औद्योगिक सुरक्षा धोक्यात आली असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या घटनांमुळे कामगारांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरु वारी सायंकाळी मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेला आग लागून पाली फाटा येथील रसायन उत्पादित रिलायन्स सिलिकॉन कंपनीला आग लागल्याने परिसरात मोठी घबराट पसरली होती. आगीचे तांडव सुरू असताना धुराचे ढग निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रांताधिकारी बोरकर यांच्या सूचनेने पोलीस प्रशासनाने पाली - खोपोली राज्य मार्गावरील वाहतूक डोनवत मार्गे वळविली होती, तर काही काळ एक्स्प्रेस-वे बंद करण्यात आला होता.
कंपनीत ज्वलनशील रसायन भरलेल्या टाक्या असल्याने आगीची तीव्रता वाढली. संपूर्ण कंपनीला आगीने घेरल्याने रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळविण्यात फायर ब्रिगेडला यश आले. कंपनीचा आगीत कोळसा झाला आहे.
रिलायन्स कंपनीच्या आगीच्या घटनेपूर्वी रसायनीसह संपूर्ण खालापूर तालुक्यात वेगवेगळ्या कंपन्यांना आगी लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या प्रकाराने पुन्हा एकदा कंपन्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. शनिवारी कोकण भवन येथील औद्योगिक सुरक्षेसह आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली.
या घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. चौकशीचा फार्स करून पुढे कोणतीच कारवाई होत नसल्याने संबंधित दोषी कंपनी व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
कंपनीची सुरक्षा कुचकामी
च्रिलायन्स सिलिकॉन कंपनीला आग लागल्याने आग विझविण्यासाठी जी उपकरणे आवश्यक आहेत, ती नसल्याचे समोर आले आहे. तर ज्वलनशील रसायन कंपनीच्या आवारात साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. कंपनी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर नसल्याचे समोर येत असून सेफ्टी अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे.
अधिकारी नॉट रिचेबल
च्औद्योगिक सुरक्षेसह आयुक्त एस. पी. राठोड यांना संपर्कसाधण्याचा मीडियाने अनेक वेळा प्रयत्न केला, मात्र फोन न घेतल्याने अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. तर काही वेळा आयुक्तांचा कॉल नॉट रिचेबल असल्याने या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढत जाणार आहे.
पोलिसांकडून चौकशी
च्भीषण आगीत कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून आगीमध्ये कोणीही कामगार सापडला नसल्याचे कंपनीने सांगितले. आग विझल्यानंतर पंचनामा सुरू करून तपासणी केली जात आहे.
च्कंपनीचे व्यवस्थापन, कामगारांचे जाब-जबाब नोंदविण्याचे काम पोलीस यंत्रणा करीत आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.