Join us  

मोठी बातमी! उद्योगपती गौतम अदानी राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर; 'या' मोठ्या विषयावर होऊ शकते चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 8:09 PM

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहोचले आहेत, या भेटीत उद्योगा संदर्भात चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. 

मुंबई- अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहोचले आहेत, या भेटीत उद्योगा संदर्भात चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. 

उद्योगपती गौतम अदानी आणि राज ठाकरे यांची भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे, याची माहिती समोर आलेली नाही. गेल्या काही वेळापासून त्यांच्यात चर्चा सुरू आहे. 

विराट कोहलीचे विक्रमी शतक अन् अनुष्का शर्माला झाला खूप आनंद, सोशल मीडियावर झाली व्यक्त

राज्यात गेल्या काही दिवसापासून उद्योगावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमिवर अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ही भेट राज्यातील उद्योगा संदर्भात सुरू असल्याचे बोलले जात आहे.  गौतम अदानी हे राज्यातील मोठ्या राजकारण्यांची भेट घेत असतात. गेल्या काही दिवसापूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनी बारामती येथे खासदार शरद पवार यांच्या एका कायक्रमात उपस्थिती लावली होती.    

एखाद-दुसरा उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे फार नुकसान नाही - राज ठाकरे  

 महाराष्ट्र राज्य सर्वार्थाने श्रीमंत आहे. त्यामुळे एखाद-दुसरा उद्योग बाहेर गेल्याने  महाराष्ट्राचे फार नुकसान होणार नाही. हा ‘दर्या मे खसखस’ असा हा प्रकार आहे. आपण गुजरातचे आहोत म्हणून त्याच भागाला प्राधान्य देणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही. राज्यकर्ता मोठ्या मनाचा असावा. तो कधीच व्यापारी नसावा. व्यापारी त्याच्या हाताखाली असावा, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड शहरात जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या वतीने शोध मराठी मनाचा या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात ठाकरे बोलत होते. त्यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ व्यंगत्रिकार प्रभाकर वाईरकर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी घेतली. त्यात ठाकरे यांनी व्यंगचित्रकला, तिचे भवितव्य, मुस्कटदाबी, सध्याचे राजकारण, बेरोजगारी यावर परखड मते मांडली. स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आणि यशराज पाटील यांनी ठाकरे यांचा सत्कार केला.

टॅग्स :गौतम अदानीराज ठाकरे