उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, दोघांमध्ये दीड तास चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 00:10 IST2025-03-16T00:09:56+5:302025-03-16T00:10:48+5:30
Gautam Adani Devendra Fadnavis: उद्योगपती गौतम अदानी यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली.

उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, दोघांमध्ये दीड तास चर्चा
Devendra Fadnavis Gautam Adani Meeting: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी भेट घेतली. शनिवारी रात्री गौतम अदानींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची सागर या शासकीय बंगल्यावर जाऊन भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. राज्यातील विविध प्रकल्पांबद्दल ही चर्चा झाल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील आणखी एका प्रकल्पाची बोली अदानी समूहाने जिंकली असून, त्यानंतर गौतम अदानी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील ही पहिली भेट आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शनिवारी (१५ मार्च) रात्री अकरा वाजेच्या सुमारास अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईसह राज्यातील विकास प्रकल्पांबद्दल दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस आणि गौतम अदानी यांच्यात दीड तास चर्चा झाली.
मुंबईतील आणखी एक प्रोजेक्ट अदानी समूहाला
धारावी पुनर्विकास प्रकल्पानंतर अदानी समूहाल मुंबईतील आणखी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळाला आहे. हा प्रोजेक्ट ३६००० कोटी रुपयांचा आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.
अदानी समूहाच्या अदानी प्रॉपर्टीज प्रा.लि. कंपनीला मुंबईतील मोतीलाल नगर I,II,III, गोरेगाव पश्चिम येथील १४३ एकरमधील गृहनिर्माण प्रकल्पाच्या पुनर्विकासाचे काम मिळाले आहे. अदानी समूहाने या प्रकल्पासाठी सर्वाधिक ३६००० कोटी रुपयांची बोली लावली होती.