मागाठाणेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली महाआरती

By मनोहर कुंभेजकर | Published: January 22, 2024 06:05 PM2024-01-22T18:05:13+5:302024-01-22T18:06:04+5:30

दहिसर पूर्व,अशोकवन, शिववल्लभ मार्ग येथे  सुमारे 10000 नागरिकांच्या उपस्थितीत येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाआरती केली.

Industry Minister Uday Samant performed Mahaarti in Magathane | मागाठाणेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली महाआरती

मागाठाणेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली महाआरती

मुंबई-शिवसेना भाजप युती मागाठाणे विधानसभा आयोजित श्री राम जन्म भूमी प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्याने युवा सेना कार्यकारणी सदस्य राज सुर्वे आयोजित आणि स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली गजर श्रीरामाचा आयोजित केला होता.

काल रात्री आयोजित या सोहळ्यात काशी येथे गंगा घाटावर जशी महाआरती होते,तशी महाआरतीसाठी खास काशी येथील वेद संपन्न ब्राह्मणांच्या मंत्रघोषात महाआरती करण्यात आली. 

तत्पूर्वी काल सायंकाळी मागाठाणे येथील नऊ प्रभागांमधून वाजत गाजत,गुलाल उधळत भव्य  मिरवणूका  निघाल्या.महिलांनी डोक्यावर कलश घेत आणि लेझीम खेळत या मिरवणूकीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.तर जेष्ठ नागरिक सुध्दा उत्साहात यावेळी सहभागी झाले. तर साक्षात रथातून राम, लक्ष्मण,सीता येथे अवतरले.

दहिसर पूर्व,अशोकवन, शिववल्लभ मार्ग येथे  सुमारे 10000 नागरिकांच्या उपस्थितीत येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाआरती केली. यावेळी स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी,आमदार प्रकाश सुर्वे,आमदार मनीषा चौधरी,राज सुर्वे सहभागी झाले होते.

 यावेळी गणपती स्तवन,भक्तिमय वातावरणात राम नामाचा जल्लोष,आधुनिक संगीतातून देश विदेशातील प्रसिद्ध नृत्यकार मंत्रामुग्ध करणारा समूह नृत्य आविष्कार सादर करण्यात आला. 

यावेळी आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले की,आज सुमारे 10000 नागरिक येथे जमले असून नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.500 वर्षा पूर्वी जे घडायला पाहिजे होते,आणि प्रभू श्रीराम यांना प्रतीक्षा करायला लागली ते आज येथे दिसून आले.

 येथे अयोध्या येथील श्री राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकरण्यात आली आणि विशेष म्हणजे राम भक्तांना प्रभू श्रीराम,सीता माता,राम लक्ष्मण,हनुमान यांचे साक्षात दर्शन येथे नागरिकांना घडले अशी माहिती राज सुर्वे यांनी दिली.

Web Title: Industry Minister Uday Samant performed Mahaarti in Magathane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.