अर्भक-माता मृत्यू प्रकरण : रुग्णालयातील वीज गेल्याप्रकरणी अभियंत्याला विचारणा, मृत्यू विश्लेषण समिती करणार तपास

By संतोष आंधळे | Published: May 3, 2024 01:24 AM2024-05-03T01:24:47+5:302024-05-03T01:25:11+5:30

भांडुप येथील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबियांसोबत सोमवारी हा प्रकार घडला.

Infant-mother death case: The death analysis committee will investigate asking the engineer in the case of power outage in the hospital | अर्भक-माता मृत्यू प्रकरण : रुग्णालयातील वीज गेल्याप्रकरणी अभियंत्याला विचारणा, मृत्यू विश्लेषण समिती करणार तपास

संग्रहित फोटो...

मुंबई : भांडुप येथील महामपालिकेच्या सुषमा स्वराज रुग्णालयात वीज गेल्यानंतर डॉक्टरांनी इमर्जन्सी मध्ये तेथील एका महिलेची प्रसूती दरम्यान नवजात शिशूचा मृत्यू झाला. त्यानंतर मातेची प्रकृती गंभीर झाल्यानेस सायन  रुग्णालयात हलविले. मात्र त्या ठिकणी तिचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मृत्यूची कारणे शोधण्यासाठी हे प्रकरण मृत्यू विश्लेषण समितीकडे पाठविण्या आले आहे. त्यासोबत या रुग्णालयाची वीज गेली कशी याचा शोध घेण्यासाठी विद्युत पुरवठा सांभाळणाऱ्या कार्यकारी अभियंता यांच्याकडून खुलासा मागविण्यात महापालिका आयुक्त कार्यालयाकडून मागविण्यात आला आहे.

भांडुप येथील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबियांसोबत सोमवारी हा प्रकार घडला.  सैदूननिसार अन्सारी या महिलेचे नाव आहे.  सिझेरियन शस्त्रक्रिये दरम्यान हा प्रकार घडला असून त्यावेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने डॉक्टरांनी टॉर्चच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया केली. मात्र दुर्दैवाने त्यामध्ये त्या महिलेच्या नवजात शिशूचा जन्मतःच मृत्यू झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यनंतर त्या महिलेची प्रकृती चिंताजनक झाली असल्याने त्यांना सायन रुग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकणी त्यांचा मृत्यू झाला.

या सर्व प्रकारामुळे अन्सारी कुटुंबीयांनी या प्रकरणी दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेऊन या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे. आठवडाभरात या संपूर्ण प्रकारणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकणाची सविस्तर चौकशी करण्यात आले आहे. माता मृत्यू कशामुळे झाला याकरिता हे प्रकरण मृत्यू विश्लेष समितीकडे पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे या रुग्णालयाचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला कसा  याची माहिती त्या रुग्णालयांचा विद्युत पुरवठा संभाळणाऱ्या अभियंत्यांकडून मागविण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर पुढची कार्यवाही करण्यात येईल.      
डॉ सुधाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य)
 

Web Title: Infant-mother death case: The death analysis committee will investigate asking the engineer in the case of power outage in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.