Join us

‘सरकारी इमारतींतील घुसखोरी रोखणार’ - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:38 PM

मुंबई महापालिकेच्या ताब्यातील घरे परस्पर विकण्यात आल्याची धक्कादायक माहिती आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत समोर आली. मुंबईतील म्हाडा, महापालिका या विविध संस्थांमार्फत त्यांच्या ताब्यातील इमारतींमध्ये घुसखोरी रोखण्याकरिता डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या ताब्यातील घरे परस्पर विकण्यात आल्याची धक्कादायक माहिती आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत समोर आली. मुंबईतील म्हाडा, महापालिका या विविध संस्थांमार्फत त्यांच्या ताब्यातील इमारतींमध्ये घुसखोरी रोखण्याकरिता डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल. यासाठी आधार आधारित कागदपत्रे तयार करुन त्याचा वापर केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी माहुल येथील महापालिकेच्या ताब्यातील इमारतीमधील घरांची परस्पर विक्री झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, म्हाडामार्फत पुनर्विकसित होणाऱ्या इमारतींमध्ये कोणाला सदनिका हस्तांतरित केली, कुठल्या व्यक्तीला ती दिली, याबाबत माहिती उपलब्ध होत नाही. त्यासाठी यासर्व संस्थांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून तयार होणाºया इमारती व त्या हस्तांतरीत झालेल्या कागदपत्रांची उपलब्धता या ठिकाणी करुन देण्यात येईल.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस