Join us

पेंग्विन दर्शनात अनंत अडचणी

By admin | Published: January 10, 2017 7:16 AM

पेंग्विन प्रकल्पाचे उद्घाटन बच्चेकंपनीच्या हस्ते करून आचारसंहितेतून पळवाट शोधत असलेल्या शिवसेनेची कोंडी

मुंबई : पेंग्विन प्रकल्पाचे उद्घाटन बच्चेकंपनीच्या हस्ते करून आचारसंहितेतून पळवाट शोधत असलेल्या शिवसेनेची कोंडी करण्याची पूर्ण तयारी विरोधकांनी केली आहे. पेंग्विनच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या चौकशीचा अहवाल जाहीर न केल्यास पेंग्विन दर्शन होऊ देणार नाही, असा सज्जड इशाराच काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निवडणुकीपूर्वी सुरू करण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे.दक्षिण कोरियावरून आणलेल्या हॅम्बोल्ट प्रजातीच्या आठ पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतर शिवसेनेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. पेंग्विनच्या मृत्यूची चौकशी, लोकायुक्तांकडे सुनावणी, केंद्रीय प्राणिसंग्रहालयातून परवाना रद्द करण्याची राणीबागेला आलेली नोटीस अशा घडामोडींमुळे हा प्रकल्पच धोक्यात आला आहे. त्यात पेंग्विनची देखभाल व राणीबागेत तशी सेवा निर्माण करण्यासाठी नेमलेली कंपनीच बोगस असल्याचे उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे महापालिका निवडणुकीपूर्वी पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना घडवून आणायचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात शिवसेना असताना विरोधी पक्षांनी मात्र पेंग्विनची रवानगी त्यांच्या मायदेशी करण्याची मागणी केली आहे. तरीही २५ जानेवारीच्या दरम्यान महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते पेंग्विन दर्शनाचे उद्घाटन करण्याचा निर्धार करणाऱ्या शिवसेनेला आता काँग्रेसने आव्हान दिले आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन पेंग्विन मृत्यूचा अहवाल जाहीर करण्याची मागणी सोमवारी केली.आयुक्तांना नोटीसपेंग्विन मृत्यूप्रकरणी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली असून, लोकायुक्त कार्यालयाने राणीबागेचे उपअधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांना समन्स बजावले होते. सध्या लोकायुक्तांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)काँग्रेस आक्रमक; शिवसेनेची कोंडीविरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. या आदेशानुसार १५ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर केला जाणार होता. च्दीडशे दिवस उलटले तरी अद्याप अहवाल सादर होत नसल्याने ठेकेदाराला वाचवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. च्मृत पेंग्विनचा अहवाल सादर केला नाही, ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर आम्ही पेंग्विन दर्शन होऊ देणार नाही. त्यानंतर राणीबागेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी पालिका आयुक्तांची असेल, असा इशारा राणे यांनी दिला आहे.महापालिकेने २५ कोटी खर्च करून हॅम्बोल्ट प्रजातीच्या आठ पेंग्विनची खरेदी केली. या पेंग्विनला भायखळा येथील प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आले होते. त्यापैकी २३ आॅक्टोबरला एका पेंग्विनचा मृत्यू झाला. पेंग्विनच्या मृत्यूचे प्रकरण विरोधकांनी चांगलचे लावून धरले आहे. बोगस कागदपत्र सादर करून त्यावर कंत्राटदाराने स्वाक्षरी केली नसल्याचे उजेडात आले.