कोरोना संकटात सर्वसामान्यांना महागाईची फोडणी; अत्यावश्यक वस्तूंसाठी होतो जास्त खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 03:52 AM2020-09-13T03:52:14+5:302020-09-13T03:52:53+5:30

‘लोकल सर्कल’ या आॅनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने देशातील २१६ जिल्ह्यांतील जवळपास १५ हजार लोकांशी संपर्क साधून अहवाल तयार केला आहे. त्यातून ही माहिती हाती आली.

Inflation in the Corona crisis; The cost of essentials is high | कोरोना संकटात सर्वसामान्यांना महागाईची फोडणी; अत्यावश्यक वस्तूंसाठी होतो जास्त खर्च

कोरोना संकटात सर्वसामान्यांना महागाईची फोडणी; अत्यावश्यक वस्तूंसाठी होतो जास्त खर्च

Next

मुंबई : कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाने घराघरांत अस्वस्थता निर्माण केली असतानाच वाढत्या महागाईमुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कोरोनापूर्व काळात किराणा, भाजीपाला आणि अन्य अत्यावश्यक सेवांसाठी जेवढा खर्च होत होता त्यापेक्षा जास्त पैसे खर्च केल्यानंतरही गरजा भागत नाहीत, अशी नाराजी ७३ टक्के नागरिकांनी व्यक्त केली आहे.
‘लोकल सर्कल’ या आॅनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने देशातील २१६ जिल्ह्यांतील जवळपास १५ हजार लोकांशी संपर्क साधून अहवाल तयार केला आहे. त्यातून ही माहिती हाती आली.
किराणा सामानाचे भाव वधारले आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून भाववाढीस तेसुद्धा एक प्रमुख कारण असल्याचे हा अहवाल सांगतो.
सध्याच्या आपत्तीच्या काळात केंद्र आणि राज्य शासनाने समन्वय साधत अत्यावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज असल्याचे मतही त्यांनी नोंदविले.

भाजीपाल्याच्या किमतींत ५०% वाढ
यंदा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस कोसळला असून सप्टेंबर महिन्यातही तो सरासरीपेक्षा जास्त बरसेल, असे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले आहे. याशिवाय कोरोना संकटामुळे वाहतूक व्यवस्थेतल्या त्रुटी, सामाजिक अंतराचे निर्बंध यांसारख्या अनेक कारणांमुळे खरेदी-विक्रीतले व्यवहार विस्कळीत झाले आहेत. शहरांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली असून, काही ठिकाणी त्यांच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण आहे.

४४% लोकांनी गेल्या सहा महिन्यांत जास्त पैसे खर्च करूनही कमी सामान मिळत असल्याचे मत नोंदविले आहे.
१०%लोकांनी आपले खर्च नियंत्रणात ठेवले असून गरजांवरही निर्बंध घालणे पसंत केले
आहे.
१९%लोकांनी गरजेपेक्षा कमी साहित्याची खरेदी करून
खर्च कमी करण्यास प्राधान्य दिल्याचे अहवाल सांगतो.

Web Title: Inflation in the Corona crisis; The cost of essentials is high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.