मुंबई: मुंबई महानगर पालिकेतर्फे मुंबईच्या 227 वॉर्ड मध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. मात्र पालिकेच्या कालच्या सुधारित लसीकरण परिपत्रकात त्रुटी असून फक्त 50 ते 60 टक्केच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत आहे अशी कैफियत शिवसेना प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक 7 च्या शिवसेना शीतल म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती.
सदर योजनेमध्ये 45 वयोगटातील पहिल्या मात्रेच्या लाभार्थीचा समावेश नाही. त्यामुळे फक्त 50 ते 60 टक्केच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत होते ही वस्तुस्थिती होती. यामध्ये पालिकेच्या पैश्याच्या आणि मनुष्यबाळाचा विनीयोग होत आहे अशी कैफियत त्यांनी शीतल लोकमतकडे काल मांडली होती. काल यासंदर्भात लोकमत ऑनलाईनवर वृत्त प्रसिद्ध झाले होते.
लोकमत ऑनलाईनची बातमी पालिका प्रशासन व राजकीय वर्तुळात व्हायरल झाली होती. शीतल म्हात्रे यांनी सुद्धा लोकमतची बातमी काल मान्यवरांना ट्विट केली होती. आपल्या पाठपुराव्या मुळे आणि लोकमतच्या वृतांमुळे अखेर आज पासून सदर वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले असे त्यांनी सांगितले.
लोकमतच्या बातमीची दखल घेत आजपासून पहिला डोस घेणाऱ्या सदर योजनेमध्ये 45 वयोगटातील पहिल्या मात्रेच्या लाभार्थीचा समावेश नाही. त्यामुळे फक्त 50 ते 60 टक्केच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत आहे ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये पालिकेच्या पैश्याच्या आणि मनुष्यबाळाचा विनीयोग होत आहे असे शीतल म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले वरील लाभार्थीसाठी वॉकईन पद्धत सुरू झाली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने ट्विट करून दिली होती. आज पासून पालिका प्रशासनाने सदर वयोगटासाठी वॉकईन पध्दत सुरू करत असल्याची माहिती नगरसेविका म्हात्रे यांनी लोकमतला दिली.
मुंबईकरांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी पालिकेच्या सुधारित सूचनेद्वारे 60 वर्षे व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशिल्ड लसीच्या पहिल्या मात्रेचे व दुसऱ्या मात्रेचे लाभार्थी आणि 45 वर्षे वयोगटातील दुसऱ्या मात्रेचे लाभार्थीना दि,24 ते 26 मे तीन दिवस वॉक ईन मुभा आहे. मात्र सदर योजनेत 45 वयोगटातील पहिल्या मात्रेच्या लाभार्थीचा समावेश नव्हता. त्यामुळे फक्त 50 ते 60 टक्केच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत होते ही वस्तुस्थिती होती. यामध्ये पालिकेच्या पैश्याच्या आणि मनुष्यबाळाचा विनीयोग होत असल्याचे असे शीतल म्हात्रे यांनी काल लोकमतला सांगितले होते. त्यामुळे नागरिकांचे लसीकरण लवकर होण्यासाठी 45 वर्षांवरील पहिल्या डोसची मात्रा घेणाऱ्या नागरिकांसाठी वॉक ईन लसीकरण पद्धत सुरू करा अशी आग्रही मागणी शीतल म्हात्रे यांनी काल पालिका आयुक्तांकडे व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली होती.