Join us

CoronaVirus News: इतर रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती द्या - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 5:10 AM

कोरोनाचे रुग्ण नसलेल्यांवर उपचार करण्याचे निर्देश सर्व खासगी रुग्णालये, दवाखान्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी न्या. बी. पी. कुलाबावाला यांना दिली.

मुंबई : कोरोनाचे रुग्ण नसलेल्यांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी केलेल्या व्यवस्थेची माहिती सार्वजनिक करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला गुरुवारी दिले आहेत. कोरोनाचे रुग्ण नसलेल्यांवर उपचार करण्याचे निर्देश सर्व खासगी रुग्णालये, दवाखान्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी न्या. बी. पी. कुलाबावाला यांना दिली.कोरोनाशिवाय अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांवर सरकारी, महापालिका व खासगी रुग्णालयांत उपचार करण्यास नकार देण्यात येत असल्याची तक्रार करणाºया अनेक याचिका वकील व सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केल्या. या याचिकांवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने वरील निर्देश दिले.अन्य आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी हेल्पलाइन नंबर उपलब्ध करावा. त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात. रुग्णालये व दवाखान्यांची यादी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी याचिककर्त्यांनी केली आहे. कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांवर उपचार करणाºया रुग्णालयांची व दवाखान्यांची यादी सार्वजनिक करा, तसेच केवळ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाºया रुग्णालयांची यादीही सार्वजनिक करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने सरकार व पालिकेला दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :मुंबई हायकोर्टकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस