Join us  

पालिकेच्या सीबीएसई शाळांची माहिती मिळणार एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 7:39 AM

शाळांचे स्वतंत्र संकेतस्थळ प्रक्रिया होणार सुरु

- सीमा महांगडेमुंबई : मुंबई पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळांतील प्रवेशांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या शाळा आंतरराष्ट्रीय सत्राच्या शाळा संलग्नतेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ असणे बंधनकारक आहे. त्यामुळे या संकेतस्थळाचे ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञांकडून या शाळांचे संकेतस्थळ बनविण्याचे काम सुरु असल्याची माहिती पालिका शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. यामुळे शाळांची सर्व प्रशासकीय माहिती, तक्रारी, उपक्रम या बद्दलची माहिती पालकांना एका क्लिकवर पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार आहे.पालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई शाळांमधील प्रवेशांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद आणि पालकांच्या मागणीनुसार अन्य महानगरपालिका परिक्षेत्रात सीबीएसई शाळा सुरु करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. २०२१-२२ मध्ये ११ सीबीएसई आणि १ आयसीएसई मंडळाच्या अशा एकूण १२ शाळा नर्सरी ते सहावीपर्यंतच्या वर्गांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. या मंडळाचे शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज पार पाडण्याच्या दृष्टीने यासाठी स्वतंत्र अशा कक्षाची ही स्थापना करण्यात आली आहे.शाळांतील शिक्षकांसाठी जे मनपा शिक्षक या शाळांत शिकविण्यासाठी इच्छुक असून इंग्रजी माध्यमातील डीएड , बीएड झालेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे. शिवाय शिक्षणाच्या निवडीसाठी लेखी परीक्षा, गटचर्चा, मुलाखत अशा ३ टप्प्यांत निवड प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली असून या शाळांसाठी सुसज्ज इमारती व साधनसामग्री प्राप्त होईल अशी व्यवस्था पालिका शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.या शाळांमध्ये एकूण २ हजार ७३० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. या प्रक्रियेत नवीन १० शाळांमध्ये असलेल्या ३ हजार ७६० जागांसाठी तब्बल ९ हजार ५२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आले होते. शाळानिहाय प्रवेशमुंबई पब्लिक स्कूल (सीबीएसई)- प्रतीक्षानगर - ३०६मुंबई पब्लिक स्कूल (सीबीएसई) - मिठागर -२५८मुंबई पब्लिक स्कूल (सीबीएसई) हरियाली -३०६मुंबई पब्लिक स्कूल (सीबीएसई) - भवानी शंकर मार्ग -२६३मुंबई पब्लिक स्कूल, (सीबीएसई) पूनमनगर- ७२मुंबई पब्लिक स्कूल, (आयसीएसई)वूलन मिल -७२मुंबई पब्लिक स्कूल,चिकूवाडी (सीबीएसई) - २७०मुंबई पब्लिक स्कूल , (सीबीएसई) जनकल्याण नगर - २९९मुंबई पब्लिक स्कूल , (सीबीएसई) राजावाडी - २६७मुंबई पब्लिक स्कूल , (सीबीएसई) अजीज बाग- ३०६मुंबई पब्लिक स्कूल , (सीबीएसई) तुंगा व्हिलेज ३०६

टॅग्स :मुंबई महानगरपालिका