Join us

मुंबईच्या ऐतिहासिक वारशाची माहिती क्युआर कोडवर होणार उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 6:35 PM

मुंबईत ऐतिहासिक इमारतींचा खजिना आहे. देश विदेशातील पर्यटकांपर्यंत मुंबईच्या या ऐतिहासिक वारशाची माहिती पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येतील

मुंबई - मुंबईत ऐतिहासिक इमारतींचा खजिना आहे. देश विदेशातील पर्यटकांपर्यंत मुंबईच्या या ऐतिहासिक वारशाची माहिती पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे  सांगितले. आगामी काळात क्युआर कोडच्या सहाय्याने एका क्लिकवर या सर्व हेरिटेज इमारतींची माहिती फोटोसह उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हर्निमन सर्कलपर्यंत प्राचिन वारसा लाभलेल्या अनेक इमारती आहेत. या इमारतींशी व मुंबईतील या ऐतिहासिक सौंदर्याशी सर्व परिचित व्हावे यासाठी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन विभाग व पर्यटन विकास महामंडळामार्फत आज हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वॉकमध्ये मंत्री श्री. रावल यांच्यासह प्रधान सचिव नितीन गद्रे, एमटीडीसीचे अधिकारी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

रावल म्हणाले की, मुंबईत प्राचीन इमारतींचा खजिना असून तो जगप्रसिद्ध आहे. मात्र या मागचा इतिहास, या इमारती केव्हा बांधल्या, कशा परिस्थितीत बांधल्या याबाबत सर्वांना माहिती मिळावी म्हणून हेरिटेज वॉक या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती  त्यांनी दिली. सकाळी 7 वाजेपासून सुरू झालेल्या या हेरिटेज वॉकचा 9 वाजेदरम्यान एशियाटीकलायब्ररी येथे समारोप करण्यात आला.

मंत्रालयात आकर्षक प्रदर्शन-जागतिक पर्यटनदिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थ्‍ाळांची माहिती दर्शविणारे प्रदर्शन मंत्रालयात भरविण्यात आलेआहे. व्याघ्र प्रकल्प, प्राचिन वारसा लाभलेल्या इमारती, जंगल, ‍निसर्गरम्य ठिकाणे आदींची थ्रीडी स्वरूपातील माहिती या प्रदर्शनात आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, मुख्य सचिव सुमित मल्लिक, पर्यटन विभागाचे प्रधानसचिव नितीन गद्रे, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड आदींच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.गिरगाव येथे स्वच्छता मोहीम-दरम्यान, गिरगाव चौपाटी येथे आज एमटीडीसीमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मंत्री रावल यांनी उपस्थित विद्यार्थी व अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.  रावल यांच्यासह अधिकारी,विद्यार्थ्यांनी गिरगाव चौपाटी परिसरात स्वच्छता केली. 

टॅग्स :मुंबई