बालकांच्या लसीकरणाची माहिती एका क्लिकवर, पोर्टल एन्ट्री ट्रॅकिंग कार्ड आधार कार्डशी जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:29 AM2017-10-07T02:29:02+5:302017-10-07T02:29:18+5:30

जन्मताच आधार कार्ड हाती पडेल, अशी केंद्र सरकारची योजना आहे. यावर राज्यात अनेक ठिकाणी अंमलबजावणी सुरू झाली आहे.

Information about vaccination of children will be linked with one click, portal entry card support card | बालकांच्या लसीकरणाची माहिती एका क्लिकवर, पोर्टल एन्ट्री ट्रॅकिंग कार्ड आधार कार्डशी जोडणार

बालकांच्या लसीकरणाची माहिती एका क्लिकवर, पोर्टल एन्ट्री ट्रॅकिंग कार्ड आधार कार्डशी जोडणार

Next

मुंबई : जन्मताच आधार कार्ड हाती पडेल, अशी केंद्र सरकारची योजना आहे. यावर राज्यात अनेक ठिकाणी अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याच धर्तीवर बालकांचे पोर्टल एन्ट्री टॅकिंग सिस्टीम सुरू करून आधार कार्डशी जोडण्याचाही विचार आहे. त्यामुळे प्रत्येक बाळाच्या जन्मापासून त्याला देण्यात आलेल्या लसींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल, असा विश्वास पालिकेच्या आरोग्य खात्याने व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारच्या इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत ९ ते १६ आॅक्टोबर रोजी लसीकरणाची इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत एक लाख ७५ हजार ८७७ बालके असल्याचे आढळून आले. त्यापैकी ९६४ बालकांनी लसीकरणाचा
डोस घेतला नसल्याचे समोर आल्याची माहिती साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर चिपळूणकर यांनी
दिली.
या मोहिमेंतर्गत तीन हजार ७०० आरोग्य सेविकांच्या माध्यमातून शहर आणि उपनगरातील गर्भवती महिला व दोन वर्षांपर्यंतच्या बालकांचे लसीकरण केले जाते. त्यासाठी झोपडपट्टी, बांधकामांची ठिकाणे, आदिवासी पाडे, डोंगराळ भाग आदी ठिकाणी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाते, अशीही माहिती त्यांनी दिली.

असा तयार होईल रेकॉर्ड : केंद्राच्या नवीन नियमानुसार बालक जन्मताच त्याचे आधार कार्ड काढले जात आहे. त्यानंतर पोर्टल एन्ट्री ट्रॅकिंग सिस्टीम आधार कार्डशी जोडण्यात येईल. केंद्राची परवानगी मिळाल्यास मुंबईतही यावर अंमल होईल. त्यामुळे एका क्लिकवर बालकाच्या आरोग्याचा संपूर्ण तपशील उपलब्ध होईल. आधार कार्डच्या मदतीने बाळाच्या आरोग्याचा तपशील सहज उपलब्ध होईल.

Web Title: Information about vaccination of children will be linked with one click, portal entry card support card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.