मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदेश दौ-याच्या पहिल्या दिवशी दक्षिण कोरियाची राजधानी स्योलमध्ये महाराष्ट्रातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत तेथील सरकारशी सामंजस्य करार करण्यात आले. तेथील पायाभूत सुविधांबाबत परिवहन मंत्री किम ह्यू मी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.दक्षिण कोरियाने महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करावी. गुंतवणुकीच्या दृष्टीने राज्यात अतिशय अनुकूल वातावरण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मंगळवारी झालेल्या करारानुसार स्मार्ट सिटी, महामार्ग, विमानतळ, मेट्रो आदी महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उभारणीत राज्याला दक्षिण कोरियाचे सहकार्य लाभणार आहे. त्यात प्रकल्पांच्या अंमलबजावणीचे नियोजन, धोरणात्मक बाबी, तंत्रज्ञान, विधिविषयक यंत्रणा आदींचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गासाठी सहकार्याचे आवाहन कोरियन नेत्यांना केले.उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी द. कोरियाची राजधानी स्योलमध्ये सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 2:23 AM