Join us

विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय समुपदेशनासाठी पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 3:22 PM

नोकरीच्या संधी, तसेच परदेशी शिक्षणासाठी उपलब्ध

 

मुंबई : पदवी, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतल्यावर उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी, तसेच परदेशी शिक्षणासाठी उपलब्ध असलेले विविध पर्यायांबाबत जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यवसाय समुपदेशनासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. यासाठी विद्यापीठाने संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन दिली असून याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या करीअरबद्दल ऑनलाईन समुपदेशन केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या https://careercounselling.mu.ac.in/ या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना लॉगिन करून त्यांच्या करीअरबद्दल असलेल्या शंकांचे समाधान करून घेता येईल.

मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील करीअर कॉऊन्सलींग पोर्टलवरून करीअरबाबत ऑनलाईन समुपदेशनसाठी विद्यार्थ्यांना पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. एकदा नोंदणी केल्यावर डॅशबोर्डमधील क्वेरी र्म भरून नोंदणी करताना वैयक्तिक माहिती, सध्या शिक्षण घेत असलेल्या अभ्यासक्रमांचा तपशील अशा अनुषंगिक बाबींची माहिती भरून नोंदणी करता येणार आहे. प्रश्नावली यशस्वीरित्या सादर केल्यावर विद्यार्थ्याना ऑनलाईन माध्यमातून समुपदेशन केले जाणार आहे.   

टॅग्स :मुंबई विद्यापीठशिक्षणविद्यार्थी