पोषण अभियानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबईत उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:09 AM2021-09-05T04:09:13+5:302021-09-05T04:09:13+5:30
मुंबई - समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये पोषण अभियानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे सोमवार, ६ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजन ...
मुंबई - समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये पोषण अभियानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे सोमवार, ६ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. त्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि मुख्तार अब्बास नक्वी सहभागी होणार आहेत.
पोषण जागृती अभियानाचे कार्यक्रम मुंबईत अंजुमन-इ -इस्लाम गर्ल्स स्कूल, एस. व्ही. रोड, बाजार रोड, वांद्रे पश्चिम, महात्मा गांधी सेवा मंदिर हॉल, एस. व्ही. रोड, वांद्रे पश्चिम, अवर लेडी ऑफ गुड कौन्सेल हायस्कूल, शिव रेल्वे स्थानकजवळ आणि पार्झर फाउंडेशनची द दादर अथॉर्नन इन्स्टिट्यूट, फिरदौसी रोड, मंचेरजी जोशी पारसी कॉलनी, दादर येथे होणार आहेत. ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लीम, पारशी, जैन आणि शीख या अल्पसंख्य समाजातील तसेच गरीब आणि मागास भागातील महिला त्यांच्या कुटुंबीयांसह मुंबईतील पोषण अभियान कार्यक्रमांना उपस्थित राहतील. त्यांना पोषणाच्या फायद्यांविषयी माहिती दिली जाईल आणि पोषण किटचे वाटपही केले जाणार आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री धारावी येथील एकात्मिक बाल विकास सेवा केंद्राला भेट देणार आहेत.