हिंदी- मराठीवर होतो अन्याय; रेल्वे त्रिब्युनलचे कामकाज चालते फक्त इंग्लिशमध्ये!
By मनोहर कुंभेजकर | Published: July 9, 2023 05:24 PM2023-07-09T17:24:54+5:302023-07-09T17:25:13+5:30
रेल्वे क्लेम त्रिब्युनल (प्रोसिजर) नियम १९८९ च्या कलम ४ मध्ये कामकाजाची भाषा हिंदी आणि इंग्लिश असावी असे लिहिले आहे.
मुंबई - रेल्वेला हिंदी- मराठी भाषेचे वावडे असून रेल्वे त्रिब्युनलचे कामकाज फक्त इंग्लिश मध्ये चालते. रेल्वे अपघात संदर्भातील कोणताही वाद ट्रीब्युनल पुढे सोडवला जातो. त्रिब्युनल म्हणजे आयोग. रेरा,कोटुंबिक न्यायालय,ग्राहक संरक्षण आयोग यामध्ये येथे सर्वत्र आपण "मराठी भाषेत " अर्ज करू शकतो, युक्तिवाद करू शकतो. मात्र रेल्वे त्रिब्युनलमध्ये फक्त इंग्लिशमध्येच अर्ज आणि युक्तिवाद करायला लावतात.
रेल्वे क्लेम त्रिब्युनल (प्रोसिजर) नियम १९८९ च्या कलम ४ मध्ये कामकाजाची भाषा हिंदी आणि इंग्लिश असावी असे लिहिले आहे. परंतू रेल्वे त्रिब्युनल मध्ये हिंदी भाषेत ही अर्ज स्वीकारत नाही, युक्तिवाद देखिल नाही. त्यामुळे जे पीडित आहेत त्यांना हायफाय इंग्लिश बोलणारे शोधावे लागतात. रेल्वे क्लेम त्रिब्युनल हे कोर्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वर प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर आहे.
या प्रकरणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जातीने लक्ष घालून रेल्वे त्रिब्युनलकडून हिंदी- मराठीवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते ॲड धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे.
रेल्वेचा हिंदी- मराठीवर अन्याय@RailMinIndia
— Adv.Dhananjay Junnarkar (@djunnarkar74) July 8, 2023
रेल्वे अपघात संदर्भातील कोणताही वाद ट्रीब्युनल ( CST ) पुढे सोडवला जातो.
महाराष्ट्रात सर्वत्र आपण "मराठी भाषेत " अर्ज करू शकतो, युक्तिवाद करू शकतो.
मात्र त्रिब्युनल वाले फक्त इंग्लिश मध्येच अर्ज आणि युक्तिवाद करायला लावतात pic.twitter.com/h3XPtJtPOW