सहकारमंत्री देशमुख यांच्या ‘लोकमंगल’वर टाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 06:17 AM2018-05-18T06:17:53+5:302018-05-18T06:17:53+5:30
राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अॅग्रो लिमिटेड कंपनीवर ‘सेबी’ने कारवाई केली आहे.
मुंबई : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अॅग्रो लिमिटेड कंपनीवर ‘सेबी’ने कारवाई केली आहे. कंपनीचे संचालक या नात्याने स्वत: सुभाष देशमुख, त्यांच्या पत्नी स्मिता यांच्यासह अन्य १० संचालकांना भांडवली बाजारात व्यवहार करण्यावर ‘सेबी’ने निर्बंध आणले आहेत.
लोकमंगल समूहांतर्गत देशमुख यांचे सहकारी बँकेसह अन्य व्यवसाय आहेत. त्यापैकीच लोकमंगल अॅग्रो लिमिटेड हा साखर कारखानाही आहे. याद्वारे देशमुख यांनी २००९-१० ते २०११-१२ या काळात सोलापूर जिल्ह्यातील ४७३९ शेतकऱ्यांना ७२.७२ लाख समभाग विकले होते. प्रत्येकी १० रुपयांनुसार त्यापोटी शेतकºयांनी ७२.७२ कोटी रुपये कंपनीला दिले. पण परतावा मिळणे बंद झाल्याप्रकरणी भागधारक शेतकºयांच्या तक्रारीवरून सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) लोकमंगल अॅग्रोला नोटीस पाठवली होती.
दुष्काळामुळे ऊस उत्पादन कमी झाले व कारखाना संकटात आला, असे कंपनीने सांगितले. पण वास्तवात संचालकांनी शेतकºयांच्या पैशांनी जमिनी खरेदी केल्या, इमारती उभ्या केल्या. त्या सगळ्याची किंमत आज १०८ कोटी रुपये आहे. ही भागधारकांची फसवणूक आहे. कंपनीने निधीचा गैरवापर केला, असे स्पष्ट करीत ‘सेबी’ने कारवाई केली आहे. यानुसार, आता संचालकांना परवानगीखेरीज भांडवली बाजारात कंपनीच्या नावे अथवा वैयक्तिक स्वरूपात व्यवहार करता येणार नाहीत. तसेच सर्व डी-मॅट खाती, समभाग व गुंतवणुकीची माहिती ‘सेबी’कडे जमा करावी लागेल.
>शेतकºयांना मिळू शकतात १२२ कोटी
हे निर्देश देताना ‘सेबी’ने शेतकºयांना पैसे परत करण्याचा ‘फॉर्म्युला’ मांडला आहे. त्यानुसार शेतकºयांना १० टक्के व्याजदाराने १२२.८६ कोटी रुपये कंपनीकडून परत मिळू शकतात. तर ६ टक्के व्याजदरानुसार किमान १०२.८० कोटी रुपये परत मिळू शकणार आहेत. पण त्यासंबंधी अद्याप निर्देश दिलेले नाहीत.