Join us

काँग्रेस संपविण्याचा डाव - संजय निरूपम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:25 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष पद दिले जाणार असल्याची बातमी आणि चर्चा ...

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष पद दिले जाणार असल्याची बातमी आणि चर्चा ही काँग्रेस पक्षाला संपविण्याच्या योजनेचा भाग असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे.

संपुआचे नेतृत्व शरद पवारांकडे सपविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त गुरुवारी राजकीय वर्तुळात होते. या पार्श्वभूमीवर संजय निरूपम यांनी ट्विटरद्वारे आपले मत मांडताना मोठे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप केला. दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्याविरोधात एक मोहीम सुरू आहे. शरद पवारांना संपुआचे अध्यक्ष पद दिले जाणार असल्याच्या वावड्या याच मोहिमेचा एक भाग आहे. याच मोहिमेंतर्गत काही दिवसांपूर्वी २३ काँग्रेस नेत्यांनी आपल्या सह्यांचे पत्र पाठविले होते. त्यानंतर, राहुल गांधी यांची कामगिरी सातत्यपूर्ण नसल्याचा दावा करत त्यांच्या नेतृत्वातील कमतरता शोधण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेसला संपविण्याचे एक मोठे षडयंत्र रचले गेले आहे. त्यानुसार, अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप निरूपम यांनी केला.