सीबीआय न्यायाधीशांच्या मृत्यूची चौकशी करा, हवालदाराचा उच्च न्यायालयात अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 06:05 AM2017-11-27T06:05:56+5:302017-11-27T06:06:06+5:30
बहुचर्चित सोहराबुद्दीन एन्काउंटर खटल्याचे कामकाज पाहणाºया सीबीआय कोर्टाचे विशेष न्या. बी.एच. लोया यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी, असा अर्ज मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराने
- जमीर काझी
मुंबई : बहुचर्चित सोहराबुद्दीन एन्काउंटर खटल्याचे कामकाज पाहणाºया सीबीआय कोर्टाचे विशेष न्या. बी.एच. लोया यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी, असा अर्ज मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर यांच्याकडे केला आहे.
मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेतील हवालदार सुनील टोके यांनी
शुक्रवारी मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन हा मागणी अर्ज सादर केला. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीची मागणी देशभरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून होत आहे. सोहराबुद्दीन एन्काउंटर खटल्याचे कामकाज पाहत असलेले न्या. बी. एच. लोया हे १ डिसेंबर २०१४ रोजी नागपूर येथे एका न्यायाधीशाच्या मुलीच्या लग्नासाठी सहकाºयांसह गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यांचा मृतदेह मुंबईत पत्नी व मुलांकडे न आणता परस्पर मूळ गावी लातूरला नेण्यात आला होता.
एका न्यायाधीशाचा मृत्यू इतका अकल्पित होणे, त्याबाबत कुटुंबीयांना पूर्ण माहिती न देणे हे संशयास्पद आहे. सोहराबुद्दीन खटल्याच्या अनुषंगाने त्यांना १०० कोटींची आॅफर देण्यात आल्याने ते तणावाखाली होते, असे त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होऊन सर्व शंकांचे निरसन व्हावे, यासाठी आपण मुुख्य न्यायाधीशांकडे अर्ज सुपुर्द केला आहे.
- सुनील टोके, अर्जदार व पोलीस हवालदार