Join us

खोपोलीत पाणीपुरवठ्याच्या कामांची चौकशी व्हावी

By admin | Published: July 02, 2014 11:00 PM

जिजामाता गार्डन येथे बोअरवेल्स बसविण्याची मागणी मंजुरी होऊनही ती पूर्ण न झाल्यामुळे नगरसेवक श्रीकांत पुरी यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत केली

खोपोली : जिजामाता गार्डन येथे बोअरवेल्स बसविण्याची मागणी मंजुरी होऊनही ती पूर्ण न झाल्यामुळे नगरसेवक श्रीकांत पुरी यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत केली. त्यानंतर नगरसेवक अरूण पुरी यांनी पाणी पुरवठा विभागात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून मंजुरीच्या अपेक्षेवर ठेकेदारांनी केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.श्रीकांत पुरी यांनी बोअरवेलच्या विचारलेल्या प्रश्नांवर अभियंता वाय.सी.पाटील, बलकवडे यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. पाणीपुरवठा सभापतींनीही त्याबाबतचे कोणतेही पेपर्स आपल्याकडे आले नसल्याचे सांगितले. नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी लोकहितासाठी मागणी होऊनही कामे होत नाहीत हा दुदैवी प्रकार असल्याचे सांगितले. त्यानंतर याप्रकरणी वाय.सी.पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी दिले.लेखापरीक्षण अहवालामध्ये ज्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे, त्यांच्यावर मुख्याधिकारी का कारवाई करत नाहीत? असा प्रश्न नगरसेवक किशोर पानसरे यांनी विचारला असता, अशा सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन धुपे यांनी दिले. दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाईची मागणीही पुरी यांनी केली. अखेर नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी, सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून, त्याच्यावर नुकसानीचा दावा दाखल करण्याचे आदेश दिले. ही सभा ज्येष्ठ नागरिक सभागृहात संपन्न झाली. (वार्ताहर)