ट्रामा केअर रुग्णालय प्रकरणी अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 06:11 AM2019-01-31T06:11:00+5:302019-01-31T06:14:29+5:30

सात दिवसांत अहवाल होणार सादर; डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर पाच जणांची गेली होती दृष्टी

Inquiries from the Additional Commissioner in the case of Trauma Care Hospital | ट्रामा केअर रुग्णालय प्रकरणी अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश

ट्रामा केअर रुग्णालय प्रकरणी अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश

Next

मुंबई : जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर पाच जण दृष्टिहीन झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी बुधवारी आयुक्तांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त कुंदन, उपायुक्त, आरोग्य हे चौकशी करतील. सात दिवसांत चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल.

सर्वपक्षीय गटनेत्यांनी बुधवारी या प्रकरणी आयुक्तांची भेट घेत चर्चा केली. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी या प्रकरणी निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. घटनेची जबाबदारी अधीक्षकांची असताना पर्यवेक्षकावर कारवाई झाल्याचे रवी राजा यांनी नमूद केले. या प्रकरणात ज्यांची दृष्टी गेली त्यांना नुकसानभरपाई म्हणून २० लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणीही विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

नक्की काय झाले?
सात रुग्णांवर ४ जानेवारी रोजी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया.
दोन दिवसांनी म्हणजे ६ जानेवारी रोजी त्यांच्या डोळ्यांची तपासणी.
त्यांच्या डोळ्यांत जंतू संसर्ग झाल्याची लक्षणे दिसून आली.
त्यांचे डोळे लालसरही झाले होते.
सात रुग्ण पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल.
मात्र या रुग्णांची दृष्टी वाचविण्यात अपयश.

४ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात डोळ्यांमध्ये लेन्स लावण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. या वेळी सात जणांची शस्त्रक्रिया करण्यात आली असताना पाच जण दृष्टिहीन झाले. तर दोन जणांना नीट दिसत नाही. दुर्घटनेतील दृष्टिहिनांमध्ये फातिमा शेख, रत्नम्मा संन्यासी, रफिक खान, गौतम गावणे, संगीता राजभर यांचा समावेश आहे.

या प्रकरणात ज्यांची दृष्टी गेली आहे त्यांना नुकसान भरपाई म्हणून वीस लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणीही विरोधी पक्ष नेत्यांनी केली आहे.

Web Title: Inquiries from the Additional Commissioner in the case of Trauma Care Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.