मुंबई - सातारा तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीला तिच्या जवळच्या नात्यातीलच आनंद पवार नामक व्यक्तीने अपहरण करून बेकायदेशीरपणे लग्न करण्यास भाग पाडून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना जुलै २०१७ मध्ये घडली आहे. अल्पवयीन मुलीस विवाहास भाग पाडल्याच्या घटनेच्या चौकशीची मागणी शिवसेना उपनेत्या व प्रतोद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.ही घटना घडल्यानंतर सदर मुलीला विविध ठिकाणी फिरण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ५६३ / २०१७ अन्वये दिनांक १८ जुलै २०१७ रोजी नोंद झाली आहे. पोलिसांनी आरोपी आनंद पवार यांना अटक केली असून या गुन्ह्यात वापरलेली गाडी देखील ताब्यात घेण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार या मुलीच्या कुटुंबीयांकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक सुबत्ता व बऱ्याच प्रमाणात जमिनी असल्याचे दिसत आहे. या मुलीच्या नावे असलेली ही संपत्ती हडप करण्याच्या उद्देशाने हा गुन्हा घडल्याचे दिसत आहे. सदर मुलीला यातील अंतस्थ हेतूबाबत मात्र अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे. या मुलीचे पालकदेखील अनेक प्रकारच्या अडचणीत असल्याची माहिती मिळत आहे.सदर मुलीला या विवाहानंतर अनेक अज्ञात ठिकाणी नेण्यात आले होते. या घटनेबाबत मी आज सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. यावर त्यांनी या घटनेवर त्वरीत कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. सदर मुलगी सध्या सुरक्षित आहे आणि तिच्या पुढील शिक्षणासाठी तिचे पालकांनी लक्ष घातले आहे. काऱ्याकडे देण्यात यावा.
अल्पवयीन मुलीस विवाहास भाग पाडल्याच्या घटनेच्या चौकशीची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 10:35 PM