Join us

निलंबित अधिका-यांकडून मागविला खुलासा, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघलमार्फत चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 5:17 AM

कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी निलंबित जी-दक्षिण विभागातील पाच अधिकाºयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तत्पूर्वी मोजोज् बिस्ट्रो आणि वन अबव्ह येथील अनियमिततेवर कारवाईप्रकरणी त्यांना पुराव्यानिशी सिद्ध करण्याची एक संधी प्रशासनाने दिली आहे.

मुंबई - कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी निलंबित जी-दक्षिण विभागातील पाच अधिकाºयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तत्पूर्वी मोजोज् बिस्ट्रो आणि वन अबव्ह येथील अनियमिततेवर कारवाईप्रकरणी त्यांना पुराव्यानिशी सिद्ध करण्याची एक संधी प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार या अधिकाºयांकडून खुलासा मागविण्यात आला आहे.कमला मिल कम्पाउंडमधील दोन रेस्टॉरेंट पबला लागलेल्या आगीत १४ लोकांचा मृत्यू तर ५५ जण जखमी झाले होते. या प्रकरणात जी-दक्षिण विभागातील इमारत व कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, दुय्यम अभियंतादिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे आणि सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी एस.एस. शिंदे या पाच अधिकाºयांचे निलंबन करण्यात आले आहे. या अधिकाºयांना पालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल या अधिकाºयांची चौकशी करणार आहेत. या चौकशीचा अहवाल महिन्याभरात सादर होणे अपेक्षित आहे. मोजोज् बिस्ट्रो आणि वन अबव्ह या रेस्टॉरेंटमधील सामायिक गॅलरी महापालिकेने १ आॅगस्ट रोजी तोडली. मात्र त्या जागेचा पुनर्वापर सुरू असल्याचे दुसºयाच महिन्यात दिसून आले. तिथे परत धाड टाकून गॅलरीतील फर्निचर जप्त करण्यात आले. परंतु वारंवार रेस्टॉरेंट मालकांकडून अग्नी सुरक्षेचे उल्लंघन होत असताना त्यांचा परवाना रद्द का करण्यात आला नाही, असा जाब विचारण्यात आला आहे.तो मार्ग धोकादायकवन अबव्ह रेस्टॉरेंटमधील शौचालय बेकायदा असल्याचे समोर आले आहे.बेकायदा बांधकाम आणि हुक्का पार्लर चालवून परवानातील अटींचा भंग केल्याप्रकरणी जी-दक्षिण विभागाने या रेस्टॉरेंटना नोटीस बजावली होती. तरीही या रेस्टॉरेंटना आगीच्या पाच दिवसांआधीच अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले होते.महापालिकेने नोव्हेंबर महिन्यात मंजूर केलेल्या गच्चीवरील रेस्टॉरेंटसाठी अर्ज करणारे वन अबव्ह हे पहिले रेस्टॉ पब होते.बेकायदा बांधकाम आणि अग्निशमन नियम धाब्यावर बसविलेल्या या रेस्टॉरेंटवर कारवाई केली नाही, या प्रकरणी संबंधित अधिकाºयांना निलंबित करण्यात आले आहे.गच्चीवरील या रेस्टो पबचा प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असल्याने धोका वाढल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

टॅग्स :कमला मिल अग्नितांडवमुंबई महानगरपालिकामुंबई