मुंबई : मनोरा आमदार निवासातील आमदारांच्या खोल्यांची दुरुस्तीची कामे न करताच वा कमी कामे करून जादा रकमेची बिले दिली गेली यावर विभागाने केलेल्या चौकशीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विभागाच्या दक्षता पथक मंडळ; मुंबईचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी ही चौकशी केली होती.या चौकशीच्या अहवालाची प्रत ‘लोकमत’च्या हाती आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे भाजपा आमदार चरण वाघमारे यांनी मनोरा आमदार निवासातील घोटाळ्यांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते. या घोटाळ्यात आतापर्यंत तत्कालिन कार्यकारी अधियंता प्रज्ञा वाळके, उपअभियंता भूषणकुमार भेगडे, शाखा अभियंता केशव धोंडगे या तिघांना आधीच निलंबित करण्यात आले आहे. तथापि, बोगस बिले बनविण्यात आणि फायदा लाटण्यात पुढे असलेल्या कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.विद्यमान सरकारच्या काळात हे घोटाळे झाले. कामांच्या मोजमाप पुस्तिकेत काही ठिकाणी खोडतोड केल्याचे चौकशीत समोर आले आहे. काम एका खोलीच्या दुरुस्तीचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात बिले ही दुसºयाच खोलीच्या दुरुस्तीची काढून कंत्राटदारांना पैसा देण्यात आल्याचेही समोर आले आहे.आ. वाघमारे, बाळासाहेब मुरकुटे, भरतशेठ गोगावले, अमल महाडिक, महेश लांडगे, रणधीर सावरकर, नितेश राणे, नारायण कुचे, इम्तियाज जलिल, अतुल सावे, सुरुपसिंह नाईक, मंत्री विनोद तावडे, गोपालदास अग्रवाल, देवयानी फरांदे, कृष्णा खोपडे, प्रदीप नाईक, हर्षवर्धन जाधव, राज्यमंत्री दादा भुसे, राम कदम, सुधीर गाडगीळ, विकास कुंभारे, मनिषा चौधरी, प्रभुदास भिलावे, महेश लांडगे, रणधीर सावरकर, मल्लिकार्जून रेड्डी आदी आमदारांच्या खोल्यांमध्ये दुरुस्तीची कामे न करताच अधिकाºयांनी कंत्राटदारांना बिलांची रक्कम दिली, असा आरोप आ. वाघमारे यांनी केला होता.चामलवार यांनी या प्रकरणी चौकशी केली असता बहुतेक आमदारांच्या खोल्यात कामे करताना अनियमितता झाल्याचे व जादाची रक्कम कंत्रादारांना अदा केल्याचे उघडकीस आले आहे. ज्या कंत्राटदारांची नावे तक्रारीमध्ये होती त्यात शिवगिरी कन्स्ट्रक्शन, मनिष एस. कंजन, विजयकुमार शेट्टे,चिंतामणी, अंगिरा एंटरप्रायजेस, बंसिधर, विकी, वृषाली मजूर सोसायटी, सुनील चव्हाण, मयुरेश मजूर सोसायटी, आर्ना कन्स्ट्रक्शन, काळे आणि सुदाम असोसिएट्स यांचा समावेश आहे. ज्या खोल्यांच्या दुरुस्तीत घोटाळे झाले त्या खोल्यांची कामे करणाºया कंत्राटदारांपैकी कोणावरही अद्याप कारवाई झालेली नाही. त्यांना काळ्या यादीत टाकण्याची भूमिकाही बांधकाम विभागाने घेतलेली नाही या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. धक्कादायक म्हणजे जी कामे झाल्याचे दाखविण्यात आले होते त्यांच्याबाबत चामलवार यांनी प्रत्यक्ष मनोरा आमदार निवासात जाऊन पाहणी केली असता कामेच झाली नसल्याचे आढळले. कामे झाली असल्याचे कोणतेही पुरावे संबंधित अधिकारी देऊ शकले नाहीत.केवळ निलंबनजे अधिकारी या घोटाळ्यांत सामील होते त्यांना केवळ निलंबित करण्यात आले. आर्थिक अनियमिततांसाठी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
भ्रष्टाचाराच्या ‘मनोऱ्या’वर चौकशी समितीचे शिक्कामोर्तब; काम न करताच दिली जादा रकमेची बिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:28 AM