जाधव यांनी दिलेल्या भेटवस्तूंची चौकशी सुरू, डायरीत संशयास्पद नोंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 08:26 AM2022-03-29T08:26:06+5:302022-03-29T08:26:38+5:30

जप्त डायरीत संशयास्पद नोंदी

Inquiry into gifts given by Jadhav continues, suspicious entries in diary | जाधव यांनी दिलेल्या भेटवस्तूंची चौकशी सुरू, डायरीत संशयास्पद नोंदी

जाधव यांनी दिलेल्या भेटवस्तूंची चौकशी सुरू, डायरीत संशयास्पद नोंदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांवेळी हाती लागलेल्या डायरीतून संशयास्पद नोंदी समोर आल्या आहेत. त्यातील नोंदीनुसार ‘मातोश्री’ला पाठवलेल्या भेटवस्तूंबाबत चौकशी सुरू झाली आहे.

प्राप्तिकर विभागाने २५ फेब्रुवारीला जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय बिमल अगरवाल तसेच ५ कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी छापे टाकले. शोध मोहिमेत जप्त केलेले पुरावे कंत्राटदार आणि जाधव यांच्यात जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट करतात. सुमारे १३० कोटींपेक्षा अधिक ३६ स्थावर मालमत्तांची माहिती हाती लागली आहे. ५० लाख रुपये किमतीचे घड्याळ आईला वाढदिवसाला भेट दिले होते. तर गुढीपाडव्याला आईच्या स्मरणार्थ त्यांनी गरजूंना २ कोटींच्या भेटवस्तू दिल्याचे जाधव यांनी चौकशीत सांगितले आहे. डायरीत कोडवर्डमध्ये व्यवहार मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार तपास सुरू आहे.

Web Title: Inquiry into gifts given by Jadhav continues, suspicious entries in diary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.