Join us

जाधव यांनी दिलेल्या भेटवस्तूंची चौकशी सुरू, डायरीत संशयास्पद नोंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 8:26 AM

जप्त डायरीत संशयास्पद नोंदी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांवेळी हाती लागलेल्या डायरीतून संशयास्पद नोंदी समोर आल्या आहेत. त्यातील नोंदीनुसार ‘मातोश्री’ला पाठवलेल्या भेटवस्तूंबाबत चौकशी सुरू झाली आहे.

प्राप्तिकर विभागाने २५ फेब्रुवारीला जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय बिमल अगरवाल तसेच ५ कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी छापे टाकले. शोध मोहिमेत जप्त केलेले पुरावे कंत्राटदार आणि जाधव यांच्यात जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट करतात. सुमारे १३० कोटींपेक्षा अधिक ३६ स्थावर मालमत्तांची माहिती हाती लागली आहे. ५० लाख रुपये किमतीचे घड्याळ आईला वाढदिवसाला भेट दिले होते. तर गुढीपाडव्याला आईच्या स्मरणार्थ त्यांनी गरजूंना २ कोटींच्या भेटवस्तू दिल्याचे जाधव यांनी चौकशीत सांगितले आहे. डायरीत कोडवर्डमध्ये व्यवहार मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार तपास सुरू आहे.

टॅग्स :शिवसेनाभाजपायशवंत जाधव