मध्य रेल्वे बिघाडाची तीन सदस्यीय समितीद्वारे चौकशी

By admin | Published: May 28, 2016 01:36 AM2016-05-28T01:36:06+5:302016-05-28T01:36:06+5:30

मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकाजवळील विद्युत पुरवठा करणाऱ्या आॅक्झिलरी ट्रान्सफॉर्मरच्या कार्यप्रणालीत तांत्रिक बिघाड झाला आणि एकच गोंधळ उडाला.

The inquiry by a three-member Central Committee on Central Railway Failure | मध्य रेल्वे बिघाडाची तीन सदस्यीय समितीद्वारे चौकशी

मध्य रेल्वे बिघाडाची तीन सदस्यीय समितीद्वारे चौकशी

Next

मुंबई : मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकाजवळील विद्युत पुरवठा करणाऱ्या आॅक्झिलरी ट्रान्सफॉर्मरच्या कार्यप्रणालीत तांत्रिक बिघाड झाला आणि एकच गोंधळ उडाला.
या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा दोन दिवस बोजवाला उडाला आणि १00पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ट्रान्सफॉर्मरची २५ वर्षांची वॉरंटी असताना अवघ्या दोन वर्षांतच त्यात बिघाड झाला आणि लोकलचा गोंधळ उडाल्याचे समोर
आले.
यानंतर मध्य रेल्वेकडून तीन सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत इलेक्टीसिटी विभाग, सिनिअर डीटीईटी आणि न्यूट्रल ब्रांच विभागातील अधिकारी असतील.
पुढील आठवड्यात समितीचा अहवाल सादर केला जाणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The inquiry by a three-member Central Committee on Central Railway Failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.