३२ वर्षांच्या सेवेनंतर आयएनएस गंगा निवृत्त

By Admin | Published: May 29, 2017 04:56 AM2017-05-29T04:56:44+5:302017-05-29T04:56:44+5:30

भारतीय नौदलातील ३२ वर्षांच्या सेवेनंतर आयएनएस गंगा ही युद्धनौका रविवारी निवृत्त झाली. गोदावरी वर्गातील ही युद्धनौका शनिवारी

INS Ganga retired after 32 years of service | ३२ वर्षांच्या सेवेनंतर आयएनएस गंगा निवृत्त

३२ वर्षांच्या सेवेनंतर आयएनएस गंगा निवृत्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय नौदलातील ३२ वर्षांच्या सेवेनंतर आयएनएस गंगा ही युद्धनौका रविवारी निवृत्त झाली. गोदावरी वर्गातील ही युद्धनौका शनिवारी अरबी समुद्रातील ४५ दिवसांची अखेरची टेहळणी संपवून मुंबई बंदरात दाखल झाली. भारतीय नौदलाने स्वदेशीचे धोरण स्वीकारल्यानंतर बनविण्यात आलेल्या सुरुवातीच्या युद्धनौकांमध्ये आयएनएस गोदावरीचा समावेश होतो. माझगाव गोदीत बांधण्यात आलेली आयएनएस गंगा ३० डिसेंबर १९८५ रोजी भारतीय नौदलात दाखल झाली होती. १२५ मीटर लांबी आणि ४ हजार २०० टन वजनाच्या या नौकेवर ३० अधिकारी आणि तीनशे जवानांचा ताफा कार्यरत होता.

Web Title: INS Ganga retired after 32 years of service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.