चीनची झोप उडणार! भारतीय नौदलाची ताकद वाढणार, आयएनएस वागीर दाखल होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 09:48 AM2023-01-20T09:48:31+5:302023-01-20T09:49:32+5:30

INS Vagir : 23 जानेवारी रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे आयएनएस वागीरच्या कमिशनिंग समारंभात नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार प्रमुख पाहुणे असतील.

ins vagir 5th electric scorpene submarine of project 75 ready for commissioning in indian navy on 23rd january | चीनची झोप उडणार! भारतीय नौदलाची ताकद वाढणार, आयएनएस वागीर दाखल होणार 

चीनची झोप उडणार! भारतीय नौदलाची ताकद वाढणार, आयएनएस वागीर दाखल होणार 

googlenewsNext

मुंबई : भारतीय नौदल पुढील आठवड्यात आयएनएस वागीर नावाची पाचवी डिझेल-इलेक्ट्रिक स्कॉर्पीन पाणबुडी दाखल होणार आहे. या वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी या वर्षाच्या अखेरीस भारतीय नौदलात दाखल होणार आहे. भारताने 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रोजेक्ट-75 प्रकल्पासाठी 2005 मध्ये फ्रान्स कंपन्यांसोबत 6 स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुड्यांसाठी करार केला होता.

23 जानेवारी रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे आयएनएस वागीरच्या कमिशनिंग समारंभात नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार प्रमुख पाहुणे असतील. मेसर्स नेव्हल ग्रुप, फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव डॉक्स (MDL) येथे सुरू असलेल्या या 'प्रोजेक्ट-75' मध्ये मोठा खर्च आणि वेळेत झाला आहे. पण आता सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे 'प्रोजेक्ट-75-इंडिया' अंतर्गत 42,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 6 अधिक प्रगत डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या तयार करण्यासाठी 'स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप' मॉडेल अंतर्गत फॉलो-ऑन कार्यक्रमात सतत होणारा मोठा विलंब आहे.

चिनी नौदल हिंद महासागर क्षेत्रात सातत्याने आपले सामर्थ्य वाढवत आहे, हे भारतीय नौदलाकडे पाण्याखालील लढाईसाठी आवश्यक असलेल्या शस्त्रास्त्र प्रणालींच्या कमतरतेच्या संदर्भात पाहिले पाहिजे. एमडीएल या खाजगी एल अँड टी शिपयार्डच्या (MLD, L&T Shipyard) सहकार्याने 6 नवीन स्कॉर्पीन पाणबुड्या तयार करणार्‍या विदेशी कंपन्यांना त्यांच्या व्यावसायिक आणि तांत्रिक बोली सादर करण्यासाठी या वर्षी ऑगस्टपर्यंत आणखी एक मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रकल्प-75I पाणबुड्यांसाठी 'एक्सेप्टेंस फॉर नेसेसिटी' पहिल्यांदा नोव्हेंबर 2007 मध्ये देण्यात आली होती. या वर्गाच्या पाणबुड्या जमिनीवर हल्ला करणारी क्रूझ क्षेपणास्त्रे तसेच दीर्घकालीन खोल पाण्याखाली राहण्यासाठी हवाई-स्वतंत्र प्रणोदनाने (Air-Independent Propulsion),  सुसज्ज असतील. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर अशा प्रकारची पहिली पाणबुडी तयार होण्यासाठी सुमारे एक दशकाचा कालावधी लागेल. 50 डिझेल-इलेक्ट्रिक आणि 10 आण्विक पाणबुड्या असलेले चीन, पाकिस्तानला एआयपीसोबत 8 युआन वर्गाच्या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या पुरवण्याच्या प्रक्रियेत आहे. नौदलाने गुरुवारी सांगितले की, आयएनएस वागीरच्या  (सँड शार्क) समावेशामुळे भारताच्या सागरी हितसंबंधांना पुढे जाण्याची क्षमता वाढेल. 

एका नौदल अधिकाऱ्याने सांगितले की, "आयएनएस वागीर अँटी-सरफेस वारफेअर, अँटी-सबमरीन वारफेअर, गुप्तचर माहिती गोळा करणे, माइन्स टाकणे आणि पाळत ठेवणे यासह विविध मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहे. आयएनएस कलवरी, आयएनएस खांदेरी, आयएनएस करंज आणि आयएनएस वेला या प्रोजेक्ट-75 च्या 4 स्कॉर्पीन पाणबुड्या भारतीय नौदलात यापूर्वीच कार्यान्वित झाल्या आहेत, ज्या लांब पल्ल्याच्या गाइडेट टॉर्पेडो आणि ट्यूब-लाँच अँटी-शिप मिसाईल्स तसेच उन्नत सोनार आणि सेन्सर सूटसह सुसज्ज आहेत."
 

Web Title: ins vagir 5th electric scorpene submarine of project 75 ready for commissioning in indian navy on 23rd january

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.