Join us

आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी घोटाळा प्रकरण; सोमय्यांची सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 7:59 AM

भाजप नेते किरीट सोमय्या सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीला हजर राहिले. सोमवारी त्यांची ३ तास चौकशी करण्यात आली होती.  

मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून अपहार केल्याच्या आरोपाप्रकरणी, भाजप नेते किरीट सोमय्या सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीला हजर राहिले. सोमवारी त्यांची ३ तास चौकशी करण्यात आली होती.  

आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून, राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता, तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा निल यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात माजी सैनिक बबन भोसले यांनी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांतील रक्कम १० कोटींपेक्षा जास्त असल्याने, हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याच प्रकरणात न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळताच, ते सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाले होते. 

चौकशीनंतर त्यांनी पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, सलग दुसऱ्या दिवशी ते चौकशीला हजर राहिले. मंगळवारी सकाळी ११ ते २ दरम्यान त्यांची चौकशी करण्यात आली. या दरम्यान त्यांचे वकील आणि सुरक्षारक्षकही सोबत होते. न्यायालयाच्या आदेशाने सलग ४ दिवस त्यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे. 

टॅग्स :किरीट सोमय्याभाजपापोलिस