मुंबई - माझगाव डॉकमध्ये निर्माणाधीन आयएनएस विशाखापट्टणमवर भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. ही आग आज सायंकाळी ५. ४४ वाजताच्या सुमारास लागली असून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल असून अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी पथकासहा आग विझविण्याचे कार्य करत आहेत. या आगीत युद्धनौकेत एकजण अडकल्याची भीती वर्तविण्यात आली आहे.
घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे 8 फायरवाहन, 7 जम्बो वॉटर टँकर आणि 1 रेस्क्यू वाहन उपस्थित असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. या घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे मुंबई आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मिळाली आहे. आयएनएस विशाखापट्टणम ही संपुर्णपणे भारतीय बनावटीची ही युद्धनौका स्टेल्थ गटातील आहे. या युद्धनौकेचे काम सुरु आहे. स्टेल्थ डिस्ट्रॉयरची भारतीय नौदलाला बर्याच वर्षांपासून प्रतीक्षा होती. स्टेल्थच्या विशेष गुणांमुळे या युद्धनौका शत्रुच्या रडारला चकवा देण्यात यशस्वी ठरतात. त्यामुळे ही युद्धनौका युद्धाच्यावेळी निर्णयाक भूमिका बजावू शकते. मीटर लांब आणि 7500 टन वजनाची ही युद्धनौका नौदलाची सर्वात विध्वंसक युद्धनौका आहे. या युद्धनौकेचं सर्वात मोठ वैशिष्ट म्हणजे ब्रम्होस हे अत्याधूनिक मिसाईल या युद्धनौकेवर असणार आहेत. तसंच चार 30 mmच्या रॅपिड फायर गन या युद्धनौकेवर आहेत. यामध्ये 50 अधिकार्यांसह 300 जवान असणार आहे.